
Eric Garcetti: अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. गार्सेट्टी यांनी मोदी सरकारच्या "परिवर्तनात्मक धोरणांचे" कौतुक केले. ते म्हणाले की 'दोन्ही देश उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांचे सहकार्य लक्षणीयरीत्या वाढवत आहेत.'
यूएस-इंडिया 5G आणि नेक्स्ट जनरेशन नेटवर्क्स वर्कशॉपच्या उद्घाटन समारंभात बोलताना गार्सेट्टी म्हणाले की, 5G एक खुल्या, सुलभ, प्रवेशयोग्य आणि सुरक्षित तंत्रज्ञान इकोसिस्टमच्या दिशेने सहयोग करण्याची एक उत्तम संधी आहे.
5G प्रणालीतर्गंत विकसित होत असेलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा दोन्ही देशांना होत आहे. भारत (India) हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे.'
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबद्दल बोलताना गार्सेटी म्हणाले की, 'पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर येणार आहेत.
त्यासाठी आमचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भेटीची तयारी करत आहेत. या भेटीदरम्यान उदयोन्मुख तंत्रज्ञानाभोवती सखोल सहकार्य आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे प्रत्येकाला जोडण्याचा प्रयत्न करते. 5G हा तंत्रज्ञानाचा कणा आहे.'
दरम्यान, यूएस-इंडिया इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज (ICET) चा एक महत्त्वाचा भाग म्हणून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भारतातील 5G आणि नेक्स्ट जनरेशन नेटवर्कची दृष्टी, उपाय आणि ऍप्लिकेशन्सवर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आघाडीचे तज्ञ आणि अधिकारी उपस्थित होते.
दुसरीकडे, या डिजिटल युगात आजही जगभरातील 2.6 अब्ज लोकांसाठी तंत्रज्ञान (Technology) आणि कनेक्टिव्हिटीचा अभाव ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असेही गार्सेटी म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.