'युध्दविरामास भारत- पाकिस्तानची तयारी'

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अत्यंत महत्वाचा करार झाला आहे.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत- चीन यांच्यातील संघर्ष गेली अनेक महिने चालू होता. मात्र दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढत सीमेवरील सैन्य मागे घेण्याची प्रकिया सुरु केली. याच पार्श्वभूमीवर आता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अत्यंत महत्वाचा करार झाला आहे. दोन्ही देश़ांकडून जम्मू काश्मीरसह इतर भागामधील नियंत्रण रेषेवर गोळीबार थांबवण्यावर सहमती झाली आहे.

भारत आणि पाकिस्तानच्या मिलिटरी डायरेक्टर जनरल यांच्याकडून संयुक्त निवेदन प्रसिध्द केले आहे. यापूर्वी भारत आणि पाकिस्तानात 2003 साली झालेल्या युध्दविरामाच्या कराराचे पालन करण्यात येणार आहे. या करारामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही वर्षापासून सुरु असलेला तणाव कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार,‘’दोन्ही देशांचे अधिकारी टेलिफोन हॉटलाइनच्या माध्यमातून संपर्कात होते. दोन्ही देशांच्या दरम्यानचा कोणताही गैरसमज दूर करण्यासाठी हॉटलाइन टेलिफोन किंवा प्लॅग मिटिंग यंत्रणेचा वापर करण्यात येणार,’’ असल्य़ाचे दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्य़ांनी सांगितले आहे.

चीनचा अजब दावा; राष्ट्राध्यक्ष जिनपिंग म्हणाले...

तसेच शांतता भंग करणाऱ्य़ा आणि हिंसाचारास उत्तेजन देणाऱ्या मुद्द्यांवर सुध्दा चर्चा करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 24,25 फेब्रुवारीपासूच्य़ा मध्यरात्री पासून या कराराची अमलंबजावणी करण्यात येणार असं निवेदनात म्हटलं आहे.  

संबंधित बातम्या