इमरान खान यांना भारतीय हवाई क्षेत्र वापरण्याची दिली परवानगी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिली आहे. इम्रान खान पुढील आठवड्यात मंगळवारी आपल्या मंत्री सहकाऱ्यांसह उच्चस्तरीय व्यावसायिक प्रतिनिधीसोबत श्रीलंकेच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जात आहेत आणि त्यांना श्रीलंकेला जाण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करण्याची आवश्यक असणार आहे.

इराणला अण्वस्त्रांपासून रोखण्यासाठी मुत्सद्दीपणा हाच उत्तम मार्ग - परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन 

यापूर्वी 2019 च्या सुरुवातीच्या काळात पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जम्मू-काश्मीरमधील मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले हवाई क्षेत्र वापरण्यासाठी अमेरिका आणि सौदी अरेबियाचा प्रवास करण्यास परवानगी नाकारली होती.

चीन सरकारने केली आपल्याच पत्रकारांवर कारवाई...

मिळालेल्या माहितीनुसार इम्रान यांची अध्यक्ष गोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याशी द्विपक्षीय बैठक होणार आहे आणि यावेळी व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान, संरक्षण आणि पर्यटन या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, इमरान खान पंतप्रधान राजपक्षे यांनी दिलेल्या निमंत्रणावरून अधिकृत भेटीवर श्रीलंकेला जात आहेत.

 

संबंधित बातम्या