संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांकडून भारताचे कौतुक; भारत कोरोनाच्या लढयातील वैश्विक नेता

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटरेस यांनी कोरोना विषाणूविरूद्धच्या जागतिक लढाईत केलेल्या नेतृत्वाबद्दल आणि जगात कोरोना विरुद्धची लसी तातडीने पुरवठा केल्याबद्दल भारताचे कौतुक केले आहे.

संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटरेस यांनी कोरोना विषाणूविरूद्धच्या जागतिक लढाईत केलेल्या नेतृत्वाबद्दल आणि जगात कोरोना विरुद्धची लसी तातडीने पुरवठा केल्याबद्दल भारताचे कौतुक केले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी, संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांना कोरोनावरील 200,000 लसी देण्याच्या प्रस्तावाबद्दल संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटरेस यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचे वैयक्तिक आभार मानले असल्याचे सांगितले. टी.एस. तिरुमूर्ती यांनी सोशल मीडियावरील ट्विटर वरून याबाबतची माहिती दिली. 

पत्रकार जमाल खाशोगींची हत्या सौदी अरेबियाच्या प्रिन्सनेच केली; अमेरिकेचा दावा

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी केलेल्या ट्विट मध्ये संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटरेस यांचे आभार मानले. तसेच संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांनी कोरोना महामारीत भारताने एक वैश्विक नेता म्हणून भूमिका पार पाडल्याचे म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटरेस यांनी भारताला लिहिलेले पत्र देखील टी.एस. तिरुमूर्ती यांनी आपल्या ट्विट मध्ये पोस्ट केले. या पत्रात संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांनी भारताने  जगातील दीडशेहून अधिक देशांना महत्वाची औषधे, किट, व्हेंटिलेटर आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे देऊन जागतिक साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे म्हटले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापराच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी नुकतीच मंजूर केलेल्या दोन लसींपैकी, एक लस विकसित आणि तयार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमुळे जागतिक लस बाजारात मोठी मदत झाली असल्याचे संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटरेस यांनी म्हटले आहे. याशिवाय, कोवॅक्स सुविधा अधिक मजबूत करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे कौतुक करत असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले. 

दरम्यान, कोवॅक्स ही जगभरात कोरोनाची लस समान वितरित करण्यासाठी एक जागतिक मोहीम आहे. आणि या मोहीमेअंतर्गतच भारताने संयुक्त राष्ट्रातील शांती सेनेला कोरोना विरुद्धच्या लसींच्या दोन लाख डोस देण्याची घोषणा केली आहे.     

संबंधित बातम्या