राहण्यालायक देशांच्या यादीत भारत सर्वात खालच्या स्थानावर; पण का?  

राहण्यालायक देशांच्या यादीत भारत सर्वात खालच्या स्थानावर; पण का?  
India.jpg

नवी दिल्ली : राहण्याच्या आणि काम करण्यासाठी लायक असणाऱ्या देशांची यादी जाहीर झाली आहे. जर्मनीतील इंटरनेशन्स संस्थेने दरवर्षीप्रमाणे 'एक्स्पॅट इनसाइडर -2021' (Expat Insider-2021) या यादीतून जर्मनीने (Germany)  राहण्यालायक देशांची यादी जाहीर केली आहे. ही यादी आपला देश सोडून इतर देशात स्थायिक झालेल्या किंवा नोकरीनिमित्त स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या पसंतीने तयार करण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी 59 देशातील 12420 नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. अशा परदेशी नागरिकांकडून ते राहत असलेल्या देशांमधील राहणीमानाचा दर्जा (Standard of living), आर्थिक खर्च (Financial expenses), वैद्यकीय सुविधा (Medical facility) अशा विविध विषयांवरील प्रश्नांच्या आधारे ही यादी बनविण्यात आली आहे.  (India ranks lowest in the list of livable countries; But why) 

एका वर्षात बायडन यांच्यापेक्षा कमला हॅरिस यांच्या संपत्तीत वाढ
  
- भारत  कोणत्या स्थानावर?  
राहण्यालायक देशांच्या जागतिक यादीमध्ये भारत (India)  सर्वात खालच्या म्हणजे 51 व्या स्थानावर आहे. कोरोना काळातील परिस्थिती, हे भारत 51 व्या स्थानावर घसरण्याचे कारण मानले जात आहे. त्याचबरोबर, भारतातील वायु प्रदूषण, पाणी आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधाची परिस्थिती अत्यंत खराब आहे, असे कारण भारतात राहणारे किंवा राहून गेलेल्या परदेशी लोकांनी सांगितले आहे. म्हणूनच भारतात राहणे आपल्यासाठी कठीण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. याशिवाय भारतातील आरोग्य व्यवस्थाबाबतही योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र  या सर्वात दिलासादायक बाब म्हणजे सर्वेक्षणातील 82 टक्के नागरिकांनी भारतातील  आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे म्हटले आहे. 

- 'हा' देश सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थानावर 
एक्स्पॅट इनसाइडर 2021 सर्वेक्षणात तैवानने (Taiwan) सलग तिसर्‍या वर्षी अव्वल स्थानावर आहे. कोरोनाच्या लढाईत तैवानने चांगली कामगिरी केली आहे. सर्वेक्षणात सामील नागरिकांनी तैवानमधील नोकरीच्या सुरक्षिततेचे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचे उघडपणे कौतुक केले. यात  96 टक्के लोकांनी तैवानमधील वैद्यकीय सेवेचे कौतुक केले आहे. तसेच, 96 टक्के स्थलांतरितांनी तैवानचे नागरिक परदेशी रहिवाश्यांप्रति अनुकूल असल्याचे म्हटले आहे.  तैवाननंतर मेक्सिको आणि कोस्टा रिका दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर राहतात. मेक्सिको आणि कोस्टारिका या दोन्ही देशांमध्ये राहणे आणि मित्र बनविणे  अत्यंत सोपे असल्याचे मत सर्वेक्षणातील लोकांनी दिले आहे.  त्याचबरोबर एक्स्पॅट इनसाइडर 2021  यादीत मलेशिया चौथ्या आणि पोर्तुगाल पाचव्या स्थानावर आहे. तर या यादीत अमेरिका 34 व्या स्थानावर आहे. 

- कुवैत (Kuwait)  7 व्यांदा  सर्वात खालच्या स्थानावर 
या सर्वेक्षणातील निकाल कुवेतसाठी आणखी वाईट असू शकत नाही. याचे कारण गेल्या आठ वर्षांत कुवैत सलग सातव्यांदा स्थलांतरितांसाठी राहण्याचे आणि काम करण्यासाठी सर्वात वाईट ठिकाणी म्हणून गणले गेले आहे. सर्वेक्षणातील 47 टक्के लोकांनी कुवैत राहण्यासाठी योग्य ठिकाण नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे, खराब आर्थिक स्थितीमुळे इटली खराब देशांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. इटलीत परदेशातून आलेल्या लोकांसाठी नोकरीच्या संधि खूपच कमी असल्याचे  सांगण्यात आले आहे. तर राहण्यालायक नसलेल्या देशांच्या यादीत दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर म्हणून घोषित करण्यात आला आहे. 

- संख्या खेळ
सर्वेक्षणात एकूण 59 देशांचा समावेश 
51 व्या क्रमांकावर भारत
अमेरिकेला 34 वा क्रमांकावर 
कुवैतला 7 व्यांदा शेवटच्या स्थानावर 
तैवान सलग 3 दा पहिल्या स्थानावर

- सर्वात वरच्या स्थानवरील पाच देश 
तैवान
मेक्सिको
कॉस्टा रिका
मलेशिया
पोर्तुगाल

- सर्वात खालच्या स्थानवरील देश 
कुवैत
इटली
दक्षिण आफ्रिका
रशिया
इजिप्त

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com