कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने सुनावले

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 डिसेंबर 2020

भारतात तीन कृषी-सुधारणा विषयक कायद्यांवरुन सुरू असलेल्या आंदोलनावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुड्यू यांनी काल जाहीर टिप्पणी केली. कॅनडाचे खासदार बर्दिश चाग्गर यांनी कॅनडात गुरुनानक जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या फेसबुक संवादात बोलताना ट्रुड्यू यांनी चिंता व्यक्त केली.

नवी दिल्ली-कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुड्यू यांनी भारतातील शेतकरी आंदोलनाबद्दल चिंता व्यक्त करत भारताच्या अंतर्गत मुद्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. याबाबत आज भारताने कॅनडाला सुनावले असून कॅनडाच्या पंतप्रधानांचे मत अनावश्‍यक असल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकरी आंदोलन ही भारतासारख्या लोकशाही देशातली एक अंतर्गत बाब आहे आणि राजनैतिक मतप्रदर्शनातून राजकीय हेतू ध्वनित केला जाऊ नये, असे प्रत्युत्तरही भारताने दिले.

भारतात तीन कृषी-सुधारणा विषयक कायद्यांवरुन सुरू असलेल्या आंदोलनावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुड्यू यांनी काल जाहीर टिप्पणी केली. कॅनडाचे खासदार बर्दिश चाग्गर यांनी कॅनडात गुरुनानक जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या फेसबुक संवादात बोलताना ट्रुड्यू यांनी चिंता व्यक्त केली. कॅनडात शीख समाज मोठ्या संख्येने आहे आणि त्यांचे नातेवाईक देखील या आंदोलनात सहभागी आहेत, असा संदर्भ देऊन ट्रुड्यू यांनी या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली आणि ही चिंता भारतीय अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. कॅनडाने नेहमीच शांततापूर्ण आंदोलनाला साथ दिली आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती.

कॅनडाच्या पंतप्रधानाने केलेल्या वक्तव्याचे पडसाद भारतात उमटले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांना यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांना प्रतिक्रिया देताना त्यांनी, कॅनडातील काही नेत्यांकडून शेतकरी आंदोलनाबाबत काही चुकीच्या माहितीवर आधारित केलेल्या विधानाकडे आमचे लक्ष वेधले आहे. 
 

संबंधित बातम्या