भारत कोरोनामुळे उद्ध्वस्त झाला, चीनने भरपाई द्यावी- डोनाल्ड ट्रम्प

भारत कोरोनामुळे उद्ध्वस्त झाला, चीनने भरपाई द्यावी- डोनाल्ड ट्रम्प
tramp.jpg

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना कोरोना विषाणूच्या साथीने भारत (India) उध्दवस्त झाला आहे. कोरोनाचा प्रसार करण्यास चीन (China) कारणीभूत असल्याबद्दल अमेरिकेला (America) 10 ट्रिलियन अमेरिकी डॉलर द्यावे असा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी गुरुवारी केला आहे. ट्रम्प यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मागणी केली आहे. कोरोनामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्त हानी झाली आहे. याआगोदर ट्रम्प यांनी कोरोनाला चिनी आणि वुहान (Wuhan) येथील व्हायरस असल्याचे म्हटले होते. (India ruined by corona China should compensate Donald Trump)

जगभर पसरत असलेला कोरोना व्हायरस ही एक मोठी दुर्घटना असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. तसेच भारतातील कोरोना परिस्थितीची माहिती देत याआधी ट्रम्प यांनी कोणत्याही इतर रोगामुळे इतके मृत्यू झाले नसल्याचे म्हटले आहे. ''भारतामधील सध्याची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. भारतामधील लोकांना उत्तम काम करण्याची सवय आहे. परंतु सत्य परिस्थिती ही आहे भारत सध्या उध्दवस्त झाला आहे. खरं तर जगभरातील देश कोरोनामुळे उध्दवस्त झाले आहेत. आता चीनने उध्दवस्त झालेल्या देशांना मदत केली पाहिजे,'' असेही ट्रम्प यांनी यावेळी म्हटले.

''जरी कोरोनामुळे ही दुर्घटना ओढावली असली तरी तुम्ही त्या देशांकडे पाहा ते आता पहिल्यासारखे होणार नाहीत. आपल्या देशावरही या दुर्घटनेचा वाईट परिणाम झाला आहे. मात्र बाकीच्या देशांना आपल्या देशापेक्षा जास्त हानी पोहोचली आहे. त्यामुळे हा कोरोना व्हायरस कुठुन आणि कसा आला याचा शोध घ्यायला हवा'' असे ट्रम्प म्हणाले. चीनमधील वुहानमध्ये 2019 कोरोनाची लागण झाल्याची पहिली घटना समोर आली होती. चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधून (Wuhan Institute of Virology) बाहेर पडला असावा असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. चीने मात्र वेळोवेळी अमेरिकेचा हा आरोप नाकारला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com