भारत पाकिस्तानला करणार कोरोना लसींचा पुरवठा 

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 10 मार्च 2021

भारताने आता पाकिस्तानला कोरोना लसींचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : भारतात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील सेवकांना लस देण्यात आली. आता केंद्र सरकारने लसीकरणाच्या दुसऱ्य़ा टप्प्यालाही सुरुवात केली. या टप्प्यात जेष्ठ नागरिकांना सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाची मोफत लस देण्यास सुरुवातही झाली. देशांतर्गत लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर केंद्रसरकारने शेजारी असणाऱ्या देशांनाही कोरोना लसींच पुरवठा करण्यास सुरुवात केली होती. मात्र यामध्ये पाकिस्तानचा समावेश नव्हता.

भारताने आता पाकिस्तानला कोरोना लसींचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत पाकिस्तानला 4.5 कोटी लसींचा पुरवठा करणार आहे. United GAVL Alliance अंतर्गत भारताकडून हा लसींचा पुरवठा होणार असल्याचे राष्ट्रीय आरोग्य सेवा, निय़मन समन्वय आणि फेडरल सेक्रेटरी आमीर अशरफ ख्वाजा यांनी सार्वजनिक लेखा समितीला य़ासंबंधी सांगितले आहे. 

स्वित्झर्लंडमध्ये महिलांना बुरखा घालण्यास बंदी; या निर्णयाचं देशात स्वागत आणि...

GAVL अंतर्गत कोरोना लसींच्या पुरवठ्यासाठी भारत आणि पाकिस्तानने हातमिळवणी केली आहे. यामुळे जगातील निम्म्याहून अधिक मुलांचं प्राणघातक आणि संसर्गजन्य रोगांविरोधात लसीकरण करण्यात येणार आहे. पाकिस्तानात वाढत्या कोरोना संकटाच्या काळात भारत पाकिस्तानला लसीकरणासाठी मदत करत आहे. सप्टेंबर 2020 मध्ये पाकिस्तानला कोरोना लसींचा पुरवठा करणार असल्याच्या करारवर स्वक्षरी करण्यात आली आहे.

ब्रिटीश राजघराण्यातील गुपीतं मेगन मर्केल यांनी केली उघड

आमीर अशरफ ख्व्जा यांनी दिलेल्या माहितीनुसार, GAVl या करारातंर्गत भारताकडून 4.5 कोटी लसींचा पुरवठा पाकीस्तानला होणार आहे. यापैकी 1.6 कोटी लसींचे डोस जून महिन्यापर्यंत उपलब्ध होणार आहेत.

पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, समीतीला माहिती देत असताना कोरोना लसींचे डोस कुठुन उपलब्ध होणार असल्याचे पाकिस्तानचे सिनेटर मुशहिद हुसैन सय्यद यांनी विचारले होते. यावेळी पाकिस्तानच्या आरोग्य सचिवांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणाऱ्या लसींचा पुरवठा होणार असल्याचे सांगितले.

‘’GAVL करारांर्गत भारतात निर्माण होत असणाऱ्या लसींचे डोस पाकिस्तानला उपलब्ध होणार आहेत. गरीब आणि विकसनशील देशांना लसींचा परुवठा करणे या कराराचा मुख्य उद्देश आहे,’’ असं त्यांनी यावेळी सांगितले.
 

संबंधित बातम्या