भारताने UN मध्ये पाकिस्तानला केले लक्ष्य, दहशतवादी संघटनांवर कारवाईची मागणी

अफगाणिस्तान दहशतवादी गटांचे आश्रयस्थान बनू नये यासाठी भारताने एकात्मिक आंतरराष्ट्रीय कारवाईचे आवाहन केले आहे.
भारताने UN मध्ये पाकिस्तानला केले लक्ष्य, दहशतवादी संघटनांवर कारवाईची मागणी
India in the UN Security CouncilDainik Gomantak

भारताने गुरुवारी सांगितले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद (जेएम) सारख्या संघटनांमधील संबंध धोका निर्माण करत आहेत. अफगाणिस्तान दहशतवादी गटांचे आश्रयस्थान बनू नये यासाठी भारताने एकात्मिक आंतरराष्ट्रीय कारवाईचे आवाहन केले आहे. (India targets Pakistan at UN)

India in the UN Security Council
US: राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा असलेली फिजिओथेरपिस्ट बनली प्रसिद्ध 'पॉर्न स्टार'

पाकिस्तानचा संदर्भ देत भारताने असेही म्हटले आहे की, बंदी घातलेल्या संघटनांना या भागात असलेल्या दहशतवाद्यांच्या सुरक्षित असलेल्या आश्रयस्थानांकडून कोणतीही मदत मिळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी यूएनएमाच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये 'आयएसआयएल-खोरासान'ची उपस्थिती, हल्ले करणेम यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

दहशतवादी संघटनांवर कारवाईचे आवाहन

सध्या 'आयएसआयएल-खोरासान' हा दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा संलग्न गट आहे, जो अफगाणिस्तानातून आपल्या कारवाया चालवत असतो. तिरुमूर्ती यांनी 1988 च्या मंजुरी समितीच्या अलीकडेच झालेल्या अहवालातील निष्कर्षांचा हवाला दिला आहे, ज्यामध्ये सूचित केले की अफगाणिस्तानमधील विद्यमान अधिकाऱ्यांनी त्यांच्या दहशतवादविरोधी वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी अधिक मजबूत कारवाई करणे आवश्यक आहे.

पाकिस्तानी दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात प्रशिक्षण शिबिरे चालवत आहेत

संयुक्त राष्ट्रांनी नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार, 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद या संघटनांच्या नेतृत्वाखाली जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यासारख्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा समावेश आहे, असे सांगण्यात आले आहे. अफगाणिस्तानातील काही प्रांतांमध्ये प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, त्यापैकी काही तालिबानच्या थेट नियंत्रणाखालील आहेत असेही यावेळी सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com