भारत-व्हिएतनाम यांच्यात ऑनलाईन चर्चेद्वारे महत्त्वपूर्ण करार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

जलस्रोतांचे सर्वेक्षण व वर्गीकरण करण्यासाठी भारत - व्हिएतनाममध्ये करार झाला. हा करार संरक्षण मंत्र्यांच्या व्हर्च्युअल बैठकीत झाला. 

नवी दिल्ली: जलस्रोतांचे सर्वेक्षण व वर्गीकरण करण्यासाठी भारत - व्हिएतनाममध्ये करार झाला. हा करार संरक्षण मंत्र्यांच्या व्हर्च्युअल बैठकीत झाला. 

संरक्षण सहकार्याचा भाग म्हणून, भारत आणि व्हिएतनाम यांनी दोन्ही देशांच्या हवाई दलाच्या वैमानिकांचे संयुक्त प्रशिक्षण आणि युनायटेड नेशन्स पीसकिपिंग मिशनमध्ये तैनात करण्यात योणाऱ्या सैन्याचे प्रशिक्षण यासंदर्भात करार केला.शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि व्हिएतनामीचे संरक्षणमंत्री जनरल एनजीओ झुआन लिच यांच्यात झालेल्या ऑनलाईन भेटीदरम्यान हे करार करण्यात आले. 

संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीचा आढावा घेऊन दोन्ही मंत्र्यांनी सांगितले की, “चालू असलेल्या प्रकल्पांवर आणि द्विपक्षीय संरक्षण गुंतवणूकीच्या भविष्यातील मार्गांवर चर्चा झाली, कोरोनाची  परिस्थिती असूनही दोन्ही सशस्त्र दलांमधील संरक्षण आदानप्रदानात सकारात्मक गती कायम असल्याने समाधानी आहोत". जहाज बांधणीआणि समुद्रावरील पाणबुडी सारख्या पृष्ठभाग क्षमता अशा संरक्षण सहकार्याच्या अनेक डोमेनमध्ये सहयोग करण्याचा विचारही दोन्ही देश करीत आहेत. 

अधिक वाचा :

हाफिज सईद तुरुंगातून गुपचूप घरात 

संबंधित बातम्या