'अभिनंदन यांना सोडले नसते तर त्या रात्री भारत हल्ला करणार होता'; पाकिस्तानी खासदाराने केला दावा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

भारत आणि पाकिस्तानी हवाई दलात झालेल्या संघर्षानंतर अभिनंदन हे पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याने त्यांना मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात तेथील सैन्याने अटक केली होती.

 इस्लामाबाद-  भारतीय हवाई दलातील पायलट अभिनंदन वर्धमान यांना इम्रान खान सरकारने युद्ध होण्याच्या भीतीने सोडून दिल्याचा दावा एका पाकिस्तानी खासदाराने केला आहे. भारत आणि पाकिस्तानी हवाई दलात झालेल्या संघर्षानंतर अभिनंदन हे पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याने त्यांना मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात तेथील सैन्याने अटक केली होती.

आपल्या भाषणादरम्यान  संसदेत बोलताना पाकिस्तान मुस्लिम लीग- एन चे नेते अयाज सादिक यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी त्यावेळी एक महत्वाची बैठक घेऊन पाकिस्तानने पायलट अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात दिले नाही तर भारत त्या रात्री ९ वाजता पाकिस्तानवर हल्ला करेल असे सांगितले होते. कुरेशी यांनी संसदीय बैठकीत पीपीपी, पीएमएल-एन आणि सैन्य दलाच्या प्रमुखांकडे अभिनंदन यांना सोडण्याबाबत विचारणाही केली होती, असे ते यावेळी म्हणाले.                 

"मला आठवते की, इम्रान खान यांनी गैरहजेरी लावलेल्या या बैठकीत शाह महमूद कुरेशी आणि सैन्य दलाचे प्रमुख भीतीने पाय कापत आणि घाम पुसत कसेबसे पोहोचले. या दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर बोलताना परराष्ट्र मंत्री कुरेशी म्हणाले की, आपल्याला काहीही केल्या अभिनंदन यांना सोडावे लागेल. आपण तसे केले नाही तर भारत ९ वाजेपर्यंत हल्ला करणार आहे."असे तीव्र मत मांडत त्यांनी इम्रान खान सरकारवर आरोप केला आहे.      
 

संबंधित बातम्या