'केवळ भारतातच नाही...', जगभरात महागाईने गाठला कळस: Report

Report: जगभरात महागाईने कळस गाठला आहे.
People
PeopleDainik Gomantak

Inflation: जगभरात महागाईने कळस गाठला आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. विकसनशील देशांव्यतिरिक्त, सिंगापूरसारखा विकसित अर्थव्यवस्था असलेला देश देखील महागाईपासून वाचलेला नाही. देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक देशांनी निर्यातीवर बंदी घातली. मलेशियाने गेल्या महिन्यात ब्रॉयलर चिकनच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मलेशियातून मोठ्या प्रमाणात ब्रॉयलर चिकन आयात करणाऱ्या सिंगापूरलाही या निर्णयाचा मोठा फटका बसला होता.

दरम्यान, खाद्य तेलापासून ते चिकनपर्यंतच्या किमतीत वाढ झाल्याने केटरिंग व्यवसायाशी संबंधित आस्थापनांनाही दर वाढवावे लागले आहेत. यामुळे लोकांना खाद्यपदार्थांसाठी 10-20 टक्के अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती 14% वाढल्या

इकॉनॉमिक रिसर्च एजन्सी कॅपिटल इकॉनॉमिक्सच्या मते, या वर्षी उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये अन्नधान्याच्या किमती सुमारे 14 टक्क्यांनी तर विकसित अर्थव्यवस्थांमध्ये सात टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.

People
Sri Lanka Crisis: 30 लाख लोकांची भूक भागवण्यासाठी 500 कोटी रुपये आवश्यकता

UN अन्न खरेदीसाठी लेबनॉनला पैसे देतेय

संयुक्त राष्ट्र लेबनॉनमधील नागरिकांना (Citizens) खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी पैसे देत आहे. बेरुतमधील रहिवासी ट्रेसी सालिबा म्हणाल्या की, 'आता आम्ही फक्त जीवनावश्यक वस्तू खरेदी करत आहोत.' त्याच वेळी, सुदानमध्ये (Sudan) परिस्थिती भयानक आहे, जिथे यावर्षी महागाई (Inflation) 245 टक्क्यांच्या अविश्वसनीय पातळीवर पोहोचू शकते. त्याच वेळी, इराणमध्ये (Iran) मे महिन्यात चिकन, अंडी आणि दुधाच्या किमतीत 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

People
Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील परिस्थिती गंभीर, हल्ल्यात भारतीय अधिकारी जखमी

जगभरात महागाई वाढण्याचे कारण काय?

जागतिक फूड कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्रांच्या इतर चार एजन्सींच्या जागतिक अहवालात म्हटले की, 'गेल्या वर्षी 2.3 अब्ज लोकांना भुकेचा सामना करावा लागला. दुष्काळ, पुरवठा साखळी समस्या, खतांच्या वाढत्या किमतीमुळे जगभरात खाद्यान्नाच्या किमती गगनाला भिडल्या. विकसनशील देशांतील निम्नवर्गीय लोकांना याचा मोठा फटका बसला आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com