अमेरिकी भारतीयांचा ट्रम्प यांच्याकडे कल

पीटीआय
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

अंतर्गत पाहणीत निरीक्षण; नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीसह अनेक मुद्यांवरून समर्थन

वॉशिंग्टन: अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार असलेले विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्या विजयाबद्दल अनेक आडाखे बांधले जात आहे. एका अंतर्गत पाहणीत अमेरिकेतील भारतीय वंशाचे मतदार ट्रम्प यांना मोठ्या प्रमाणावर समर्थन देत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. या मागे प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील मैत्रीसह अनेक कारणे असल्याचे यात म्हटले आहे. 

‘ट्रम्‍प व्हिक्टरी इंडियन अमेरिकन फायनान्स कमिटी’ या संस्थेने ही पाहणी केली. पूर्वीचे अध्यक्ष काश्मीरसारख्या भारताच्या अंतर्गत मुद्यांपासून दूर राहिले असले तरी ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली. 

अमेरिकेत राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या कुटुंबातील सदस्य भारतात राहतो. त्यामुळे चीनपासून भारत सुरक्षित राहावा आणि हे ट्रम्प यांच्यामुळे शक्य होईल, अशी भावना त्यांच्‍यामध्ये आहे. 

संबंधित बातम्या