Congo: UN च्या कार्यालयावर सशस्त्र गटांचा हल्ला, भारतीय जवानांची मोठी कारवाई

UN Complex Attacked: कांगोमधील काही नागरी सशस्त्र गटांनी संयुक्त राष्ट्रांची (UN) मालमत्ता लुटण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सैनिकांनी हाणून पाडला.
Congo
CongoDainik Gomantak

कांगोमधील काही नागरी सशस्त्र गटांनी संयुक्त राष्ट्रांची (UN) मालमत्ता लुटण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सैनिकांनी हाणून पाडला.

दरम्यान, लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, काही नागरी सशस्त्र गटांनी काँगोमधील (Congo) संयुक्त राष्ट्रांची मालमत्ता लुटण्याचा प्रयत्न केला. या गटांनी भारतीय लष्कराचे ऑपरेटिंग बेस आणि लेव्हल-3 हॉस्पिटल लुटण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भारतीय शांती सैनिकांची कारवाई संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसारच आहे.

Congo
China सीमेवर भारताची मोठी तयारी, गेल्या 5 वर्षांत 15,000 कोटी केले खर्च

दुसरीकडे, “भारतीय सैन्याने (Indian Army) संयुक्त राष्ट्रांचे कर्मचारी आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित केली आहे,” असे लष्कराने म्हटले आहे. लष्कराने पुढे सांगितले की, 'काही कार्यालयात तोडफोड झाल्याचे वृत्त आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सोमवारी शेकडो आंदोलकांनी कार्यालयावर हल्ला केला. पूर्वेकडील गोमा शहरात काही कार्यालये लुटली.'

काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयांवर हल्ला करण्यात आला

''आंदोलकांनी शहरातील रस्ते अडवून कार्यालयांची तोडफोड केली. काही मालमत्तेची नासधूस केली आणि मिशन कॉम्प्लेक्सच्या एका गेटला आग लावली. आमच्या एका गोदामावर आज सकाळी निदर्शकांनी हल्ला केला. त्यामध्ये त्यांनी काही उपकरणे लुटली," असे काँगोमधील शांतता अभियानाच्या प्रवक्त्याने सांगितले.

Congo
Indian Citizen बनतायेत 'परदेशी नागरिक', दरवर्षी एक लाखाहून अधिक भारतीय...

शिवाय, मिशनने एका निवेदनात म्हटले आहे की, 'संयुक्त राष्ट्रांविरुद्ध काही व्यक्ती आणि गटांकडून प्रतिकूल टिप्पण्या आल्यानंतर हा हल्ला झाला. भारतीय सैन्य संयुक्त राष्ट्र (UN) शांतीरक्षक दलाचा भाग म्हणून जगभरातील 14 UN मिशन पैकी 8 मध्ये उपस्थित आहे. सध्या संयुक्त राष्ट्राच्या ध्वजाखाली 5,400 हून अधिक लष्करी कर्मचारी कार्यरत आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com