Indian-China Border Issue : भारत-चीन दरम्यान आज पॅगोंग विषयी बैठक

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) जवळील पॅगोंग सरोवरापासून पूर्णपणे माघार घेतल्यानंतर आता भारत आणि चीन आज शनिवारी गोगरा, डेपासंग आणि हॉट स्प्रिंग्जमधून सैन्य मागे घेण्याची चर्चा करणार आहेत.

भारत-चीन: पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण सीमारेषे(एलएसी) जवळील पॅगोंग सरोवरापासून पूर्णपणे माघार घेतल्यानंतर आता भारत आणि चीन आज शनिवारी गोगरा, डेपासंग आणि हॉट स्प्रिंग्जमधून सैन्य मागे घेण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. या दोन्ही देशांच्या सैन्यातील कोर कमांडर स्तरावरील चर्चेची ही दहाव्या फेरीतील बैठक असणार आहे. चीनच्या बाजूने मोल्डो येथे आज सकाळी दहा वाजता होणाऱ्या एलएसी या मुद्याहून गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेला गंभीर तणाव संपविण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भारताकडून प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व लेह येथील 14 व्या कोर्सेसचे कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन करणार आहेत तर चिनी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व पीपल्स लिबरेशन आर्मीच्या दक्षिण शिनजियांग मिलिटरी डिस्ट्रिक्टचे कमांडर मेजर जनरल लियु लिन करणार आहेत.

दोन्ही देशांचे कॉर्प्स कमांडर डेप्सांग, गोगरा आणि हॉट स्प्रिंग्जमधून माघार घेण्यासाठी आराखडा तयार करणार आहेत. राजनयिक स्तरावरही या विषयांवर चर्चा सुरूच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. गरज भासल्यास  सैन्य आणि मुत्सद्दी बोलणी समांतर पातळीवर केली जाणार आहे.

दरम्यान भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये मागच्या वर्षी जून महिन्यात लडाख भागातील गलवान खोऱ्यात मोठी झडप झाली होती.आणि त्यानंतर दोन्ही देशातील संबंध अधिकच तणावपूर्ण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. यावेळेस भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताच्या वीस जवानांनी आपला जीव गमवला होता. आणि त्यावेळी चीनच्या बाजूने देखील मोठी हानी झाल्याची माहिती पुढे आली होती. मात्र या घटनेला अनेक महिने उलटून गेल्यानंतर कालच चीनने भारतीय सैन्यासोबत झालेल्या झटापटीत आपले चार सैनिक शहिद झाल्याचे जाहीर केले आहे. चीनच्या सरकारी मालकीच्या वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारत आणि चीन यांच्या सैन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या ट्विटरवर अकाऊंटवरून शेअर केला आहे. 

Indian-China Border Issue : चीननं जारी केला गलवान खोऱ्यातील संघर्षाचा व्हिडिओ
 

 

 

संबंधित बातम्या