UN मध्ये भारताचा डंका, अमनदीप सिंग गिल बनले डिजिटल तंत्रज्ञानातील 'लीडर'

भारताचे वरिष्ठ राजनयिक अधिकारी अमनदीप सिंग गिल (Amandeep Singh Gill) यांची शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आपले दूत म्हणून नियुक्ती केली.
Amandeep Singh Gill
Amandeep Singh GillDainik Gomantak

भारताचे वरिष्ठ राजनयिक अधिकारी अमनदीप सिंग गिल यांची शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आपले दूत म्हणून नियुक्ती केली. युनायटेड नेशन्सने त्यांचे वर्णन डिजिटल तंत्रज्ञानातील विचारशील लीडर म्हणून केले आहे. (indian diplomat amandeep singh gill appointed as un chief envoy on-technology)

दरम्यान, अमनदीप सिंग गिल हे 2016 ते 2018 या कालावधीत जिनिव्हामध्ये झालेल्या निःशस्त्रीकरण परिषदेसाठी भारताचे (India) राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी होते. आता ते इंटरनॅशनल डिजिटल हेल्थ अँड आर्टिफिशियल इंटेलिजेंस रिसर्च कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, जे ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अँड डेव्हलपमेंट स्टडीज, जिनिव्हामध्ये कार्यरत आहेत.

Amandeep Singh Gill
झेलेन्स्की यांना मी युद्धाच्या धोक्याची चिथावणी दिली होती, मात्र..: जो बायडन

तसेच, संयुक्त राष्ट्राने (United Nations) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डिजिटल तंत्रज्ञानातील अमनदीप सिंग गिल एक विचारशील लीडर आहेत. त्यांना डिजिटल तंत्रज्ञानातील बारकावे चांगले समजतात. याआधी, गिल कार्यकारी संचालक आणि डिजिटल सहकार्य (2018-2019) वरील UN महासचिवांच्या उच्चस्तरीय पॅनेलचे सह-प्रमुख राहीले आहेत.

Amandeep Singh Gill
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना रशियात 'नो एंट्री'

शिवाय, अमनदीप सिंग गिल (Amandeep Singh Gill) यांनी किंग्ज कॉलेज, लंडन येथून पीएचडी पूर्ण केली. पंजाब (Punjab) विद्यापीठ, चंदीगड येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन्समध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि जिनिव्हा विद्यापीठातून फ्रेंच इतिहासामध्ये डिप्लोमा केला आहे. ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात व्हिजिटिंग स्कॉलर देखील आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com