पाकिस्तानातील भारतीय दूतावासाला धोका

Indian High Commissioner
Indian High Commissioner

इस्लामाबाद: पाकिस्तानची(Pakistan) राजधानी इस्लामाबादमध्ये(Islamabad) असलेल्या भारतीय उच्चायुक्तांना मोठा धोका असल्याचं म्हटलं जात आहे. सुरक्षा(Security) यंत्रणेत पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारकडूनही(Imran Khan Government) बरेच दुर्लक्ष केले जात आहे. उच्चायुक्तांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पाकिस्तानच्या ढिसाळ वृत्तीबद्दल भारताने आपला निषेध नोंदविला आहे. भारत सरकारने अलीकडेच पाकिस्तानला भारतीय उच्चायुक्तांच्या(Indian High Commission in pakistan) बाहेर कथित सुरक्षा उल्लंघनाची चौकशी करण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हाय सिक्युरिटी झोन ​​म्हणजेच डिप्लोमॅटिक एन्क्लेव्हमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाबाहेरील काही विचित्र हालचाली दिसल्या. भारतीय हाय कमिशनच्या बाहेरील लोकांसाठी मर्यादित क्षेत्रात कार थांबली. यातून लोक पीपीई किटसह कोविड-19 मदत साहित्याचे बॉक्स उतरताना दिसले. त्यापैकी एकाने बॉक्ससह उभे असतानाचा फोटो क्लिक देखील केला. या फोटोच्या बॅकग्राउंडला भारतीय उच्चायोग होता. जिथे फोटो क्लिक करण्यास मनाई आहे.

मिळालेल्या माहितीनुसार त्या लोकांसोबत काही स्थानिक पोलिस अधिकारी देखील असल्याचे समजले. ही घटना अत्यंत गांभीर्याने घेत भारतीय अधिका्यांनी पाकिस्तानकडे अधिकृत चौकशी करण्यास सांगितले आहे. परंतु, त्या घटनेमागील हेतू अद्याप समजू शकलेला नाही. एका सामान्य पाकिस्तानी नागरिकालाही उच्च आयोगात प्रवेश घेण्यासाठी विशेष परवानगीची आवश्यकता असते.

भारतातील कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान पाकिस्तानने मदतीची ऑफर दिली होती. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, कोविड-19 च्या सध्याच्या परिस्थितीतचा विचार करता आम्ही कोरोनाविरूद्धच्या युद्धात वापरल्या गेलेल्या काही वस्तू भारतीय लोकांशी असलेल्या ऐक्य भावनेपोटी पाठवण्यास तयार आहोत.

या निवेदनात असेही म्हटले आहे की, जागतिक महामारीमुळे उद्भवणार्‍या आव्हानांचा सामना करण्यासाठी पुढील  पुरवठा त्वरीत करण्यासाठी सहकाराच्या संभाव्य मार्गांचा शोध दोन्ही देश घेऊ शकतात. यापूर्वी इम्रान खान यांनीही ट्विट करुन भारतातील कोरोनाबाबत एकता दर्शविली होती. मात्र, पाकिस्तानने दिलेली मदतीची ऑफर भारताने स्वीकारली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com