पाकिस्तानात अडकले भारतीय नागरिक; सुटकेसाठी भारतीय उच्चायुक्तालयाकडे संपर्क 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 13 एप्रिल 2021

बैसाखीनिमित्त पाकिस्तान स्थित ननकाना साहिब गुरुद्वारच्या यात्रेसाठी गेलेले काही शीख भाविक लाहोरमधील गुरुद्वारा डेरा साब याठिकाणी अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली :  बैसाखीनिमित्त पाकिस्तान स्थित ननकाना साहिब गुरुद्वारच्या यात्रेसाठी गेलेले काही शीख भाविक लाहोरमधील गुरुद्वारा डेरा साब याठिकाणी अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. बैसाखीनिमित्त गुरुद्वारा दर्शनासाठी पाकिस्तानला गेलेल्या यात्रेकरूंची एक तुकडी गुरुद्वारा पंजा साहिबमध्ये पोहोचू शकली नाही. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या निषेधामुळे शीख भाविकांना  हसनब्दल गुरुद्वारा पंजा साहिबमध्ये प्रवेश न मिळाल्याने या भाविकांना लाहोरमधील गुरुद्वारा डेरा साब याठिकाणी हलविण्यात आले आहे. अडकलेले सर्व भाविक आता सुटकेसाठी भारतीय उच्चायुक्तालयाकडे  संपर्क साधत आहेत.  त्याचबरोबर त्यांनी  भाविकांसाठी अधिक चांगली व्यवस्था करण्याची मागणी पाकिस्तान सरकारकडे केली आहे.  (Indian nationals stranded in Pakistan; Contact the Indian High Commission for release)

'द रॉक' अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार? 46 टक्के अमेरिकी नागरिकांचा...

या घटनेविषयी भारतीय उच्चायोगाने माहिती दिली आहे. पाकिस्तानातील  गुरुद्वारा दर्शनासाठी भाविकांना पंजा साहिबल जायचे होते. परंतु तेहरीक-ए-लबिक पाकिस्तानचे कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे हा मार्ग बंद होता. त्यामुळे भाविकांना निश्चित ठिकाणी पोहचता आले नाही. तथापि, भारतीय उच्चायोग  सर्व भाविकांच्या संपर्कात आहे. दरम्यान,  पाकिस्तान  पोलिसांनी टीएलपीच्या ज्येष्ठ नेत्याला अटक केली आहे.  या अटकेचा निषेध करत अनेक समर्थक देशाच्या विविध भागात आंदोलन करीत आहेत. यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. भारतीय शिख भाविकांची ही तुकडी नानकाना साहिबसह पाकिस्तानमधील वेगवेगळ्या शीख तीर्थक्षेत्रांना भेट देणार होती. यासाठी या सर्व प्रवाश्यांची पाकिस्तानात जाण्यापूर्वी आरोग्य तपासणीही करण्यात आली होती. आरोग्य अहवाल आणि कोरोना अहवाल तपास अहवाल नकारात्मक आल्यानंतरच त्यांना पाकिस्तानात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. 

जागतिक बँकेने ईएफआयमच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली भारतीयावर

सोमवारी सर्व प्रवासी पाकिस्तानकडे रवाना झाले होते. आता शीख भाविकांची ही तुकडी २२ एप्रिल रोजी भारतात परत येईल. अशी माहिती शिरोमणी गुरुद्वारा मॅनेजर कमिटी अर्थात एसजीपीसी सचिव मोहिंदरसिंग अहिल यांनी दिली आहे. दरम्यान, 1974 च्या धार्मिक स्थळांच्या भेटीसंदर्भातील द्विपक्षीय प्रोटोकॉल अंतर्गत, दरवर्षी बैसाखी,  गुरु अर्जुन देव यांचा शहीद दिवस, महाराजा रणजितसिंग यांची पुण्यतिथी आणि शीख गट गुरु पर्व  याठिकाणी अनेक भारतीय शीख भाविक पाकिस्तानात जात असतात.  मात्र यावर्षी पाकिस्तानमधील कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एका शीख समुदायाच्या एका गटाला नानकाना साहिबला  जाण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.  कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी वाढ पाहता, त्यांची सुरक्षा आणि सीमेपलीकडील धोका लक्षात घेता त्या भाविकांना पाकिस्तानात जाण्याची परवानगी नकरण्यात आली होती. अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. 

संबंधित बातम्या