Historic England: भारतीय वंशाच्या नरिता चक्रवर्ती यांना मिळाली मोठी जबाबदारी

भारतीय वंशाच्या वास्तुविशारद आणि डिझाइन अ‍ॅडव्होकेट नरिता चक्रवर्ती यांची हिस्टोरिक इंग्लंड सोसायटीच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
England Flag
England FlagDainik Gomantak

भारतीय वंशाच्या वास्तुविशारद आणि डिझाइन अ‍ॅडव्होकेट नरिता चक्रवर्ती यांची हिस्टोरिक इंग्लंड सोसायटीच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही संस्था इंग्लंडमधील पर्यावरण आणि इतिहासाचा वारसा सांभाळण्याचे काम करते. (indian origin architect and design advocate nairita chakraborty has been appointed to commissioner of historic england)

दरम्यान, हिस्टोरिक इंग्लंडचे (England) आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चक्रवर्ती म्हणाले की, मी आपल्या सहकाऱ्यांसोबत काम करण्यास उत्सुक आहेत. यादरम्यान, त्यांनी असेही सांगितले की, 'आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आपल्या सहकाऱ्यांनी आपल्याला चांगले काम करण्यासाठी प्रेरणा दिली. आपण अत्यंत आव्हानांच्या काळात जगत आहोत.' त्या पुढे म्हणाल्या की, 'ही संस्था आपली सांस्कृतिक ओळख दर्शवते.'

England Flag
भारताने रशियापुढे ठेवला रुपयात तेल-शस्त्रे खरेदीचा प्रस्ताव, ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता

तसेच, नरिता चक्रवर्ती यांचं बालपण दिल्लीत (Delhi) गेले. त्यानंतर त्या स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरमध्ये शिकण्यासाठी यूकेला गेल्या. हेरिटेज, टाउनस्केप आणि डिझायनिंग या क्षेत्रात त्यांना 16 वर्षांचा अनुभव आहे. चक्रवर्ती या आधीच हिस्टोरिक इंग्लंड सल्लागार समितीचे सदस्य आहेत. चार वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची या आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 1 जुलै 2022 ते जून 2026 असा असेल.

शिवाय, नरिता चक्रवर्ती (Narita Chakraborty) यांना मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विकास करण्याबरोबर ऐतिहासिक इमारतींचा शाश्वत वापर सुनिश्चित करण्याचा अनुभव आहे. त्यांनी लंडनमधील (London) काही प्रतिष्ठित प्रकल्प जसे की, अलेक्झांड्रा पॅलेस, टोटेनहॅम हाय रोड, हॉलबॉर्न टाऊन हॉल तसेच मिडल्सब्रो येथील ऐतिहासिक डॉकयार्डवर काम केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com