जम्मू- काश्मीर भारताचा अविभाज्य भाग,UNSC मध्ये पाकिस्तानला चपराक

काल 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने आपल्या सवयीप्रमाणे काश्मीरचा मुद्दा बैठकीत उपस्थित केल्यावर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले.
जम्मू- काश्मीर भारताचा अविभाज्य भाग,UNSC मध्ये पाकिस्तानला चपराक
Indian slams Pakistan in UNSC on Jammu Kashmir & Ladakh border issue Dainik Gomantak

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) मंगळवारी झालेल्या बैठकीत भारताने (India) पुन्हा एकदा पाकिस्तानला (Pakistan) झापले आहे. दहशतवादावर बोलताना पाकिस्तानकडून येणाऱ्या दहशतवादावर कठोर आणि निर्णायक कारवाई करणे सुरूच राहील असे खडसावतच कोणत्याही प्रकारच्या अर्थपूर्ण संवादासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे ही इस्लामाबादची (Islamabad)जबाबदारी आहे जी केवळ दहशतवाद, शत्रुत्व आणि हिंसामुक्त वातावरणात होऊ शकते असे स्पष्ट मत भारताच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (United Nations) बैठकीत मांडले आहे. (Indian slams Pakistan in UNSC on Jammu Kashmir & Ladakh border issue)

काल 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने आपल्या सवयीप्रमाणे काश्मीरचा मुद्दा बैठकीत उपस्थित केल्यावर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. यालाच उत्तर देताना जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणाऱ्या अधिकारी भट यांनी भारताची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की संपूर्ण जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्यात पाकिस्तानचा बेकायदेशीरपणे कब्जा केलेला भाग देखील समाविष्ट आहे. भारताने काल पुन्हा पाकिस्तानला त्यांच्या बेकायदेशीर ताब्याखालील सर्व क्षेत्रे त्वरित रिकामी करण्यास सांगितले आहे.

संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनमधील सल्लागार काजल भट यांनी सांगितले की, भारत पाकिस्तानसह सर्व शेजारी देशांशी सामान्य संबंध ठेवू इच्छितो त्याचबरोबर शिमला करार आणि लाहोर घोषणेनुसार सर्व समस्यांचे निराकरण द्विपक्षीय आणि शांततेने केले पाहिजे. आणि यासाठी भारत बच्चनबद्ध असल्याचे मत देखील भारताकडून मांडण्यात आले आहे. काजल भट यावर अधिक बोलताना पुढे म्हणाल्या की "परंतु, कोणताही अर्थपूर्ण संवाद दहशत, शत्रुत्व आणि हिंसामुक्त वातावरणातच होऊ शकतो." असे अनुकूल वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकिस्तानवर आहे. तोपर्यंत भारत सीमेपलीकडील दहशतवादाला उत्तर देण्यासाठी ठोस आणि निर्णायक पावले उचलतच राहील.

Indian slams Pakistan in UNSC on Jammu Kashmir & Ladakh border issue
'भारत-पाकिस्तान सीमेजवळ 10 किमीच्या परिघात प्रवास करु नका'

UNSC मध्ये खुल्या चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रत्युत्तरादाखल डॉ. भट्ट म्हणाले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हा संपूर्ण केंद्रशासित प्रदेश पाकिस्तानच्या बेकायदेशीर कब्जात असलेल्या भागांसह भारताचा अविभाज्य भाग होता आणि नेहमीच राहील. आम्ही पाकिस्तानला बेकायदेशीर ताब्याखालील सर्व क्षेत्रे त्वरित रिकामी करण्याचे आवाहन करतो.त्याचबरोबर भारताने UNSC ला सांगितले की ते पाकिस्तान प्रायोजित सीमापार दहशतवादाच्या विरोधात कठोर आणि निर्णायक कारवाई करत राहील. भारताच्या प्रतिनिधीने असेही म्हटले आहे की कोणत्याही अर्थपूर्ण संवादासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे जी केवळ दहशतवाद, शत्रुत्व आणि हिंसामुक्त वातावरणात आयोजित केली जाऊ शकते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com