भारतीयांची स्विस बॅंकेत 20 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम!

भारतीयांची स्विस बॅंकेत 20 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम!
bank.jpg

भारतीयांनी (Indian) स्विस बॅंकेत (Swiss bank) जमा केलेली रक्कम 20 हजार कोटींच्या पुढे गेली आहे. गुरुवारी स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बॅंकेने (Central Bank of Switzerland) जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीनुसार, 2020 मध्ये भारतीय नागरिक आणि कंपन्यांनी स्विस बॅंकांमध्ये तब्बल 20,700 कोटी रुपये जमा केले आहेत.

एकीकडे खासगी बॅंकामध्ये (private bank) जमा केलेली रक्कम खाली असताना वित्तीय संस्था आणि कंपन्यांनी सिक्युरिटीज आणि इतर मार्गांनी मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली आहे. एसएनबी च्या आकडेवारीनुसार, भारतीयांची 2019 च्या अखेरीस भारतीयांच्या ठेवींची संख्या 6,625 कोटी इतकी आहे. (Indians have more than Rs 20000 crore in Swiss banks)

स्विस बॅंकेच्या माहितीनुसार, याआगोदर 2016 मध्ये भारतीय ठेवींनी 6.5  अब्ज स्विस फ्रॅंकची विक्रमी नोंद गाठली होती. मात्र त्यानंतर 2011, 2013 तसेच 2017 वगळता स्विस बॅंकेमध्ये भारतीयांनी पैसे जमा करण्यामध्ये फारसा रस दाखविला नव्हता. परंतु 2020 ने जमा करण्यात आलेल्या रकमेचे सगळे आकडे मोडले. 2020 मध्ये ज्या ठिकाणी खासगी ग्राहकांच्या खात्यामध्ये भारतीय ठेवींमध्ये जवळपास 4000 कोटी रुपये होते. तर इतर बॅंकामार्फत 3100 कोटी रुपये जमा झाले. त्याचबरोबर सर्वाधिक 13,500 कोटी रुपये बॉंड, सुरक्षा ठेव आणि इतर माध्यमांद्वारे गुंतवण्यात आले आहेत. ही सादर करण्यात आलेली आकडेवारी अधिकृत असून काळ्या पैशाशी या आकडेवारीचा संबंध नसल्याचेही स्विस बॅंकद्वारे स्पष्ट केले आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com