शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ला लंडनमधूनही पाठिंबा

Indians residing in London supports Farmer agitations in India
Indians residing in London supports Farmer agitations in India

लंडन :  भारत सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लंडनमधूनही पाठिंबा मिळाला आहे. लंडनमधील काही भारतीयांनी, विशेषत: शीख नागरिकांनी हजारोंच्या संख्येत एकत्र येत मोर्चा काढला. मात्र, यावेळी कोरोना नियम न पाळल्याने काही जणांना स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटकही केली. 

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शकांनी मोर्चा काढला होता. येथील प्रसिद्ध ट्रॅफलगार चौकातून निदर्शक फलक घेऊन जाताना दिसत होते. ‘आम्ही पंजाबमधील शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत’ अशा घोषणा हे निदर्शक देत होते. या मोर्चावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन होत होते. मोर्चेकऱ्यांच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडीही झाली होती. ब्रिटिश पोलिसांनी वारंवार इशारा देऊनही उल्लंघन होतच राहिल्याने किमान ३० जणांना अटक करून दंड ठोठावण्यात आला. ब्रिटिश प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही आंदोलकांशी चर्चा करू, असे भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com