इंडिगो विमानाचे पाकिस्तानात एमर्जन्सी लँडिंग

IndiGo Sharjah-Hyderabad Flight: इंडिगो विमानाचे पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग, तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण वळवले
Indigo Airline Salary Hike
Indigo Airline Salary HikeDainik Gomantak

स्पाइसजेटनंतर आता इंडिगोच्या विमानाचे पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान पाकिस्तानातील कराची येथे उतरवण्यात आल्याचे सांगण्यात आले. सर्व प्रवाशांना येथे सुरक्षित उतरवण्यात आले आहे. त्यानंतर विमान कंपनी आता प्रवाशांसाठी दुसरे विमान पाठवू शकते. (IndiGo Sharjah-Hyderabad Flight)

असे सांगण्यात आले की हे विमान शारजाहून हैदराबादला जात होते, जेव्हा पायलटला विमानात काही हजार फूट उंचीवर तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आला ,तेव्हा अखेर विमान कराचीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या या विमानाची तपासणी सुरू आहे.

स्पाइसजेटचे विमानही पाकिस्तानात लॅंड केले होते
इंडिगोपूर्वी, स्पाइसजेटचे विमानही तांत्रिक बिघाडानंतर पाकिस्तानात पोहोचले. या विमानाचे इमर्जन्सी लँडिंगही पाकिस्तानातील कराची येथे करण्यात आले. या विमानात 150 लोक होते, ज्यांना प्रथम पाकिस्तानमध्ये उतरवण्यात आले आणि त्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली, नंतर सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानातून दुबईला पाठवण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com