भारतीय वंशाच्या व्यक्तींना अमेरिकेत मिळते दुय्यम दर्जाची वागणूक

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 जून 2021

एका वर्षात दोन भारतीय अमेरिकी व्यक्तीपैंकी एकाला तरी दुय्यम दर्जाच्या वागणूकीला सामोरे जावे लागते.

अमेरिकेत (United States) राहत असणाऱ्या व्यक्तींना अनेक वेळा दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याचे समोर आले आहे. किंवा त्यांना वेगळे पाडल्याचे अनुभव देखील येतात, असेच काही अनुभव एका पाहणीमधून निदर्शनास आले आहेत.

‘सोशल रिअ‍ॅलिटिज ऑफ इंडियन अमेरिकन्स अ‍ॅटीट्यूड सर्व्हे मध्ये म्हटले की, भारतीय अमेरिकी 1200 लोकांची पाहणी करण्यात आली. कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस, जॉन हॉपकिन्स, युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वेनिया (University of Pennsylvania) यांनी 2020 मध्ये हा अहवाल तयार केला आहे. 'युगव्ह' (Yugov) या आस्थापनाचा देखील या पाहणीत समावेश आहे. अमेरिकेत राहत असणाऱ्या भारतीय व्यक्तींना (Indian persons) अनेक वेळा सापत्न वागणूक दिली जात असल्याचे समोर आले आहे. किंवा त्यांना समाजातून वेगळे पाडल्याचे अनुभव देखील येतात, असे एका पाहणीतून समोर आले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात चीनी तंत्रज्ञानाला मात देण्यासाठी अमेरिकेचा मास्टर प्लॅन

भारतीय अमेरिकी नागरिकांना नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. एका वर्षात दोन भारतीय अमेरिकी व्यक्तीपैंकी एकाला तरी दुय्यम दर्जाच्या वागणूकीला सामोरे जावे लागते. यामध्ये ज्या भारतीय अमेरिकी व्यक्तींचा जन्म अमेरिकेत झाला त्यांना तर मोठ्याप्रमाणात अशा वागणूकीला सामोरे जावे लागते. विदेशात जन्मलेल्या भारतीय व्यक्तींना अशा प्रकारांना सामोरे जावे लागत नाही. अमेरिकेत भारतीय अमेरिकी लोकंमध्ये लग्न आपल्याच समुदयामध्ये करण्याचे प्रमाण हे खूप जास्त आहे, असे अहवालात म्हटले आहे.

America : मानव रहित ड्रोनद्वारे विमानात इंधन भरण्यास मिळाली सफलता

निष्कर्ष
1 अमेरिकेमध्ये जन्म घेतलेल्या भारतीय अमेरिकी व्यक्तींमध्ये तेथेच जन्म घेतलेल्या भारतीय नागरिकांना जोडीदार म्हणून निवडण्याचे प्रमाण हे चारपट अधिक आहे.

2 भारतीय अमेरिकी लोकांमध्ये धार्मिक चालीरितींचा प्रभाव मोठा आहे. परंतु त्यांच्या पध्दती वेगवेगळ्या आहेत. साधरणत:हा तीन चतुर्थांश लोकांच्या जीवनामध्ये धर्माला महत्त्व आहे. 

3 तसेच, चाळीस टक्क्याहूंन अधिक लोक दिवसामधून एकदा तरी प्रार्थना करतात. तर 27 टक्के लोक आठवड्यामधून एकदा तरी धार्मिक स्वरुपाची कृत्ये करतात. विशेष म्हणजे भारतीय अमेरिकी लोक जातीनेही ओळखतात. 

 

संबंधित बातम्या