पाम तेलाचा वाद सोडवण्यासाठी इंडोनेशिया आणि मलेशिया एकत्र लढणार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

आम्ही पाम तेल उद्योगाचे रक्षण करू जेणेकरून ज्यांचे जीवनमान पूर्णपणे मलेशिया आणि इंडोनेशियातील पाम तेलावर अवलंबून आहे अशा लाखो लोकांची यातून मदत होईल,” असे मुहिद्दीन म्हणाले. 

जकार्ता: इंडोनेशिया आणि मलेशिया हे दोन देश जगातील पाम तेलाची सर्वाधिक निर्यात करणारे देश आहेत. पाम तेलाविरूद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद सुरू आहे. हे वाद सोडविण्यासाठी इंडोनेशिया आणि मलेशिया एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहेत, असे दोन्ही देशाच्या नेत्यांनी शुक्रवारी जकार्तामध्ये सांगितले. या दरम्यान दोन्ही नेत्यांनी युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या पाम तेलविरोधी मोहिमेवर आपली चिंता व्यक्त केली. इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन्ही राष्ट्रांना पाम विषयावर एकमेकांकडून बांधिलकीची अपेक्षा आहे असे मत या पत्रकारपरिषदेत व्यक्त करण्यात आले.

"पाम तेलाच्या उत्पादक देशांना बळकटी देण्यासाठी पाम तेलाच्या वादाच्या मुद्यावर मलेशिया इंडोनेशियाला सहकार्य करत आहे, ज्यामुळे आम्ही पाम तेल उद्योगाचे रक्षण करू जेणेकरून ज्यांचे जीवनमान पूर्णपणे मलेशिया आणि इंडोनेशियातील पाम तेलावर अवलंबून आहे अशा लाखो लोकांची यातून मदत होईल,” असे मुहिद्दीन म्हणाले. 

कोरोना संकटात झोपडपट्टीवासीयांचीही स्वप्नं होणार साकार -

त्याचबरोबर दक्षिण-पूर्व आशियाई देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना या आठवड्यात लष्करी बंडखोरीनंतर म्यानमारमधील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी विशेष बैठक घेण्यास सांगितले जाईल, असे मलेशिया आणि इंडोनेशियाच्या नेत्यांनी शुक्रवारी सांगितले.

गेल्या वर्षी पदभार स्वीकारल्यानंतर मलेशियाचे पंतप्रधान मुहिद्दीन यासीन यांची ही पहिली अधिकृत परराष्ट्र भेट होती. विडोडो यांच्या निमंत्रणावरून ते गुरुवारी दुपारी जकार्ता येथे  पोहचले होते.

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

संबंधित बातम्या