Indonesia Earthquake: भूंकपाने हादरले इंडोनेशिया, 44 लोक ठार; 300 जण जखमी

Indonesia Earthquake: इंडोनेशियाच्या जावा बेटावर सोमवारी 5.4 तीव्रतेचा भूकंप झाला.
Earthquake
EarthquakeDainik Gomantak

Earthquake In Indonesia: इंडोनेशियाच्या जावा बेटावर सोमवारी 5.4 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यात 44 लोक ठार आणि सुमारे 300 जखमी झाले. एका स्थानिक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, सुमारे डझनभर इमारतींचे नुकसान झाले आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचे केंद्र पश्चिम जावा प्रांतातील सियांजूर भागात होते, ज्याची खोली 10 किलोमीटर (6.2 मैल) होती.

दरम्यान, सियांजूर जिल्ह्यातील स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, घरांसह डझनभर इमारतींचे नुकसान झाले आहे. ग्रेटर जकार्ता परिसरात भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. राजधानीतील गगनचुंबी इमारती (Building) तीन मिनिटांपेक्षा जास्त काळ हादरल्या तर काहींना बाहेर काढण्यात आले.

Earthquake
Indonesia मध्ये कुत्र्याचे मांस लोकप्रिय, आरोग्याचा विचार न करता खरेदी सुरूच

दुसरीकडे, फेब्रुवारीमध्ये, पश्चिम सुमात्रा प्रांतात 6.2 तीव्रतेच्या भूकंपात 25 लोक ठार आणि 460 हून अधिक जखमी झाले होते. जानेवारी 2021 मध्ये, पश्चिम सुलावेसी प्रांतात 6.2 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामध्ये 100 हून अधिक लोक ठार तर सुमारे 6,500 जखमी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com