उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग! इंडोनेशियन माणसानं कुकरशीचं केलं लग्न

हा तरुण इंडोनेशियाचा (Indonesia) रहिवासी आहे, त्याचे नाव काहरोल अनाम आहे.
उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग! इंडोनेशियन माणसानं कुकरशीचं केलं लग्न
Indonesian Man Marries His Rice Cooker Dainik Gomantak

हे जग विचित्र लोकांनी भरलेले आहे. आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुण स्वयंपाक करणाऱ्या कुकरशी लग्न (Marriage) करत आहे. हे तुम्हाला विचित्र वाटेल, पण हे खरे आहे. लग्नानंतर, तरुणाने कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर फोटो टाकला, पण नंतर प्रकरण काही वेगळेच निघाले.

हा तरुण इंडोनेशियाचा (Indonesia) रहिवासी आहे, त्याचे नाव काहरोल अनाम आहे. त्याने ट्विटरवर काही फोटोज शेअर केली आहेत, ज्यात तो पांढऱ्या लग्नाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. शेजारी राईस कुकर ठेवण्यात आला आहे, ज्याला वधूचा पोशाख घातला आहे. याशिवाय, अनाम कुकरसोबत अशा पोझमध्ये फोटो काढत आहे, जणू ती मुलगी आहे. एका फोटोमध्ये, तो कुकरचे चुंबन घेत आहे, जसे सामान्यतः वधू आणि वर लग्नात करतात.

Indonesian Man Marries His Rice Cooker
'आम्हीही एक मुस्लिम देश आहोत'; तालिबानच्या निर्णयांवर भडकला कतार

फोटोसह ही गोष्ट सांगितली

सुरुवातीला लोक त्याला एक विनोद समजत होते, पण काही वेळानंतर अनामने दुसरा फोटो टाकला. ज्यामध्ये तो कायदेशीर औपचारिकता पूर्ण करताना दिसत आहे. यासोबतच त्याने कुकरला बाजूला ठेवून काही कागदपत्रांवर स्वाक्षरीही देखील केली केली. अनामने सांगितले की हा विनोद नाही, पण तो सर्व काही कायदेशीररित्या करत आहे.

जेव्हा त्या व्यक्तीने ट्विटर व्यतिरिक्त फेसबुकवर फोटो पोस्ट केले. त्याने तिथे लिहिले की पांढरा, शांत, परिपूर्ण. जास्त बोलत नाही, स्वयंपाक करताना चांगले, एक स्वप्न सत्यात उतरते. तुझ्याशिवाय माझे भात बनणार नाही. त्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले, ज्यावर 44 हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. या व्यतिरिक्त ते 13 हजार पेक्षा जास्त वेळा रिट्विट केले गेले.

घटस्फोटाचे कारण

लग्नाचा फोटो पोस्ट केल्यानंतर चार दिवसांनी अनामने एक नवीन घोषणा केली. तो म्हणाला की मी माझी पत्नी 'कुकर' ला घटस्फोट (Divorce) देत आहे. त्यामागचे कारणही त्याने सांगितले. अनामने लिहिले की ती तांदूळ बनवण्यात चांगली आहे, पण ती इतर कोणतीही डिश बनवत नाही. यामुळे मी त्याला घटस्फोट देत आहे.

दुसरीकडे, लोक सोशल मीडियावर त्या व्यक्तीचा खूप आनंद घेत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की मी एअर फ्रायरशी लग्न करण्याचा विचार करत आहे, तर दुसऱ्याने कमेंट केली की हा मुलगा हुशार आहे, पण तो हनिमून कसा साजरा करेल. त्याच वेळी, एका व्यक्तीने विचारले की या व्यक्तीने त्याच्या राईस कुकरशी लग्न केले आहे की दुसरे कोणी? अशा प्रकारे लोकांनी यावर मजेदार कमेंट केले आहे. नंतर हे उघड झाले की अनामने हे सर्व विनोदाने केले होते. तो सोशल मीडियावर त्याच्या मजेदार सामग्रीसाठी ओळखला जातो.

Related Stories

No stories found.