कर्मचाऱ्याचा अपमान करणं मेगन मार्केल यांना पडलं महाग

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

केस्टिंगटन पॅलेसमध्ये मेगन मार्केल वास्तव्याला होत्या त्या वेळी त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांचा अपमान केला होता.

लंडन : इंग्लडच्या राजघराण्यातील युवराज प्रिन्स हॅरी यांच्य़ा पत्नी मेगन मार्केल यांनी आपल्याच कर्मचाऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्याचे आदेश बुधवारी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसने जारी केले आहेत. तसेच राजघराण्याच्या विरोधात केल्या जाणाऱ्या आरोपासंदर्भातही राजघराण्याकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. केस्टिंगटन पॅलेसमध्ये मेगन मार्केल वास्तव्याला होत्या त्या वेळी त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांचा अपमान केला होता. मर्केल यांनी पॅलेसमधून दोन खासगी कर्मचाऱ्यांना धमकावून बाहेर काढलं होतं. त्यांनी कर्मचाऱ्याला बाहेर काढताना त्यांचा घोर अपमानही केला होता. या घटनेच्या संदर्भात अधिकृत तक्रार पॅलेसच्या प्रशासनाकडे प्रिन्स हॅरीसाठी काम करणारे तत्कालिक संपर्क सचिव जेसन नॉफ यांनी केली होती. संपर्क सचिव नॉफ हे प्रिन्स हॅरी यांचे भाऊ प्रिन्स विल्ययम्स यांच्यासाठी आता काम करत आहेत.

एलॉन मस्कच्या गर्लफ्रेंडची कलाकृती अवघ्या 20 मिनिटांत करोडोंना विकली गेली

तर दुसरीकडे ''पॅलेसमध्ये जुन्या आणि नव्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. राजघराण्याचे व्यवस्थापन आणि काम याला शेकडो वर्षाचा इतिहास आहे,'' असं बकिंगहॅम पॅलेसद्वारा काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. ''असा शेकडो वर्षाचा ऐतिहासीक वारसा असणाऱ्य़ा ठिकाणी एखाद्याचे शोषण तसेच त्याच्याशी केलेली गैरवर्तवणूक खपवून घेतली जाणार नाही,'' असंही पॅलेसकडून स्पष्ट केलं आहे.

व्हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्केल या प्रिन्स हॅरी यांच्याशी लग्न करण्याआगोदर सूट्स टिव्हीमधून झळकल्या होत्या. इंग्लंडच्या राजघराण्यातील धाकटे सुपुत्र प्रिन्स हॅरी यांच्यासोबत 19 मे 2018 मध्ये विवाह झाला होता. सध्या प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्केल अमेरिकेत वास्तव्यास आहेत.  
 

संबंधित बातम्या