इंटरफेरॉन बिटा ठरतेय उपयुक्त

PTI
मंगळवार, 21 जुलै 2020

प्रायोगिक चाचण्यांमध्ये या उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्णांची स्थिती सुधारल्याचे दिसून आले.

लंडन

ब्रिटनमधील सायनरजेन या कंपनीने कोरोनावरील उपचार पद्धतीच्या प्रयोगिक चाचण्यांमध्ये यश मिळाल्याचा दावा केला असून यामुळे कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर होण्यापासून रोखली जाऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. प्रथिनांच्या वापरावर ही उपचार पद्धती अवलंबून आहे.
‘सायनरजेन’च्या म्हणण्यानुसार, या उपचार पद्धतीत इंटरफेरॉन बिटा या प्रथिनाचा वापर केला जातो. विषाणू संसर्ग होतो त्यावेळी हे प्रथिन शरीरात निर्माण होते. उपचारांदरम्यान हे प्रथिन नेब्युलायझरच्या साह्याने थेट फुफ्फुसांत सोडले जाते. यामुळे प्रतिकारक्षमता वाढून रोगाचा प्रतिकार होईल. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्तांसाठी ही उपचार पद्धती फायदेशीर ठरू शकते, असा दावा या कंपनीचे प्रमुख रिचर्ड मार्सडन यांनी केला आहे. प्रायोगिक चाचण्यांमध्ये या उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्णांची स्थिती सुधारल्याचे दिसून आल्याचेही ते म्हणाले.

आतापर्यंत इंजेक्शनच्या स्वरुपात अनेकांना माहित असलेल्या इंटरफेरॉन बिटा हे औषध श्‍वासामार्फत घेऊन फुफ्फुसांची ताकद वाढविते आणि कोरोना विषाणूपासून लवकरात लवकर मुक्तता देते, असे चाचणीतून दिसून आले आहे.
- टॉम विल्कीन्सन, संशोधक

चाचणीचे निष्कर्ष
- रुग्णांची स्थिती सुधारली
- श्‍वास घेण्यातील अडथळा कमी झाला
- रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी तिपटीने कमी झाला

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या