Vladimir Putin यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जारी केले अटक वॉरंट, जाणून घ्या कारण

Russian President Vladimir Putin: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. युक्रेनियन मुलांच्या "बेकायदेशीर निर्वासन" साठी ही कारवाई करण्यात आली आहे.
Vladimir Putin
Vladimir Putin Dainik Gomantak

Russian President Vladimir Putin: आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने शुक्रवारी जाहीर केले की, त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. युक्रेनियन मुलांच्या "बेकायदेशीर निर्वासन" साठी ही कारवाई करण्यात आली आहे.

हेग-आधारित आयसीसीने सांगितले की, त्यांनी मुलांच्या हक्कांसाठी रशियाचे अध्यक्षीय आयुक्त मारिया लव्होवा-बेलोवा यांच्याविरुद्धही अशाच आरोपांवर वॉरंट जारी केले आहे.

दरम्यान, रशिया (Russia) आयसीसीचा सदस्य नाही. अशा परिस्थितीत आयसीसीने वॉरंटची अंमलबजावणी कशी करायची हे स्पष्ट नाही.

"आज, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या प्री-ट्रायल चेंबर II ने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर व्लादिमिरोविच पुतिन आणि मारिया अलेक्सेयेव्हना लव्होवा-बेलोवा यांच्यासह युक्रेनमधील परिस्थितीच्या संदर्भात दोन व्यक्तींसाठी अटक वॉरंट जारी केले," यासाठी आयसीसीने एका निवेदन जारी केले आहे.

Vladimir Putin
Vladimir Putin: 'हुकूमशहा वेळोवेळी बदललेले आहेत; युद्धात रशिया पराभूत झाली तर पुतीन यांना...'- रशियन मुत्सद्द्याचे मोठे वक्तव्य

तसेच, व्लादिमीर पुतिन हे "मुलांच्या बेकायदेशीर निर्वासन आणि युक्रेनच्या (Ukraine) व्यापलेल्या प्रदेशातून रशियन फेडरेशनमध्ये मुलांचे बेकायदेशीर हस्तांतरण करण्याच्या युद्ध गुन्ह्यासाठी कथितपणे जबाबदार आहेत."

Vladimir Putin
Vladimir Putin: पुतिन यांनी PAK ला पाठवला खास संदेश, दक्षिण आशियाबद्दल...!

त्याचबरोबर, रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा हे गुन्हे 24 फेब्रुवारी 2022 चा असल्याचे ICC ने म्हटले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, "वरील गुन्ह्यांसाठी पुतीन वैयक्तिक गुन्हेगारी जबाबदारी घेतात यावर विश्वास ठेवण्यास वाजवी कारणे आहेत."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com