शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरुन पाठींबा

शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरुन पाठींबा
International support for the farmers movement

 वाशिंग्टन:  गेल्या  दोन  महिन्यांपासून  केंद्र  सराकरने  बनवलेल्या  कृषी  कायद्याच्या विरोधात  दिल्लीच्या  सीमेवर  सुरु  आहे. सरकार  आणि  शेतकरी  नेते  यांच्यात  चर्चेच्या अनेक  फेऱ्या  पार  पडल्या  मात्र  योग्य  तो  तोडगा  निघू  शकला  नाही. आता  शेतकरी आंदोलनाला  अंतरराष्ट्रीय  स्तरावरुन  पाठींबा  मिळत  आहे. जगप्रसिध्द  पॉपस्टार  रिहाना यांनी  ट्विट  करुन  आंदोलनाला  पांठिबा    दिला.  त्यानंतर  आता  अनेक  प्रसिध्द  सेलिब्रेटी आंदोलनाला  पाठिंबा  देण्य़ासाठी  पुढे  येवू  लागले  आहेत.

अमेरिकेच्या  नवनिर्वाचीत उपाध्याक्षा  कमला  हॅरिस  यांच्या  भाचीने  पुढे  येत  दिल्लीच्या  सीमेवर  गेल्या  दोन महिन्यापासून  सुरु  असणाऱ्या  आंदोलनाला  पाठिंबा  दिला  आहे. मीना  हॅरिस  यांनी शेतकऱ्यावर  केंद्र  सरकारकडून  मनमानी  पध्दतीने  होत  असलेल्या  कारवाईच्या विरोधात  ट्विट  करत  या अन्याया  विरोधात  सर्वांनी  आवाज  उठवावा  असे  आवाहन  केले  आहे. कृषी  कायद्यावरुन  होत  असलेल्य़ा  आंदोलनावरुन  केंद्रसराकर  आणि  शेतकरी  यांच्यात दिल्लीच्य़ा  सीमेवर  तणाव  निर्माण  झाला  आहे. टिकरी,  सिंघू, गाझीपूर  या  सीमांवर देशभरातून  शेतकरी  जमला असून  या  सीमांवर  युध्दभूमीचे  वातावरण  तयार  झाले आहे.

 ‘’हा  किती  मोठा  योगायोग  आहे  की, जगातील  सर्वात  मोठी  लोकशाहीवर  गेल्या  काही दिंवसापासून  हल्ला  होत आहे. जगातील  सर्वाधिक  लोकसंख्या  असणाऱ्या  देशाची  लोकशाही  धोक्यात  आली  आहे.  भारतात  आंदोलक  शेतकऱ्यांविरुध्द  दिल्ली  पोलिसांचा वापर  आणि  आंदोलनस्थळी  होत  असणारा  मूलभूत  सुविधांच्या  प्रश्नाविरुध्द  आपण सर्वांनी  एकत्र  येवून  आवाज  उठवला  पाहिजे’’ असं आवाहन  कमला  हॅरिस  यांच्या भाची  मीना  हॅरिस  यांनी  केला.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com