जी 7 परिषदेसाठी मोदींना निमंत्रण 

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

जी  7  गटात  प्रामुख्याने कॅनडा, जपान, अमेरिका, इटली, जर्मनी, ब्रीटन, फ्रान्स  या  देशांचा  समावेश  होतो. या  वर्षीच्या बैठकीचा  विषय  कोरोना  महामारी  असण्याची  शक्यता  वर्तवली  जात  आहे.

 लंडन :   ब्रीटनमधील   कॉर्नवॉल  येथे  पार  पडत  असणाऱ्या  जी  7  परिषदेसाठी  पंतप्रधान  नरेंद्र मोदींना  ब्रीटनचे  पंतप्रधान  बोरिस  जॉन्सन  यांनी  निमंत्रण  दिलं  आहे.  या  वर्षाच्या मध्यात  म्हणजेच   11  ते  13  जून  दरम्यान  ब्रिटनच्या  अध्यक्षतेखाली  या  देशांची  उच्चस्तरीय  बैठक  पार  पडणार  आहे. 

गेल्या  वर्षीच  पाहुणे  देश  म्हणून  दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया   या  देशांबरोबर  भारताची  निवड  करण्यात  आली  होती. त्याची औपचारिक  घोषणा  रविवारी  करण्यात  आली  आहे. यावर्षी  भारतात  प्रजासत्ताक  दिनाचे प्रमुख  पाहुणे  म्हणून  ब्रीटनचे  पंतप्रधान  बोरिस  जॉन्सन  येणार  होते. मात्र  कोरोनाच्या संकटामुळे  त्यांची  भारत  भेट  रद्द  करण्यात  आली.

जी  7  गटात  प्रामुख्याने कॅनडा, जपान, अमेरिका, इटली, जर्मनी, ब्रीटन, फ्रान्स  या  देशांचा  समावेश  होतो. या  वर्षीच्या बैठकीचा  विषय  कोरोना  महामारी  असण्याची  शक्यता  वर्तवली  जात  आहे.

संबंधित बातम्या