आयफोनची किमया..३०० मीटर उंचीवरून पडूनही जसाच्या तसा..!

वृत्तसेवा
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

गॅलिओट्टो यांनी असा दावा केला की जीपीएस ट्रॅकिंगचा उपयोग करून त्यांना समुद्रकिनार्‍याजवळ सापडला आणि तो 300 मीटरच्या अंतरावरून खाली पडूनदेखील बचावला.

ब्राझील :  ब्राझीलच्या मीडिया आउटलेट अहवालानुसार, व्हिडिओ कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असताना ब्राझीलचा माहितीपट निर्माता एर्नेस्टो गॅलिओट्टोतडून चुकून त्याचा आयफोन 6 एस छोट्या विमानाच्या खिडकीतून खाली पडला. गॅलिओट्टो यांनी असा दावा केला की जीपीएस ट्रॅकिंगचा उपयोग करून त्यांना समुद्रकिनार्‍याजवळ सापडला आणि तो 300 मीटरच्या अंतरावरून खाली पडूनदेखील बचावला. त्यांचा फोन अजूनही सुरळीतपणे चालत असून, फोन खाली पडतानाचा फ्री फॉल व्हिडीओदेखील त्यांच्या फोनमध्ये शूट झाला आहे. यामुळे आयफोनच्या दर्जाबाबत सकारात्मक चर्चा सुरूझाली आहे.

संबंधित बातम्या