इराण-अमेरिका संबंधांचा नवा अध्याय सुरू होणार? इराणने टाकले एक पाऊल पुढे

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना बरेच ताणले गेले होते. तर आता डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेवरून पायउतार झाले असून, अमेरिकेची सूत्रे डेमोक्रॅट्स पक्षाचे जो बायडन यांच्या हातात गेली आहेत. त्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री जावद जरीफ यांनी आज इराण अमेरिकेसोबत नवीन संबंध बनवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना बरेच ताणले गेले होते. तर आता डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेवरून पायउतार झाले असून, अमेरिकेची सूत्रे डेमोक्रॅट्स पक्षाचे जो बायडन यांच्या हातात गेली आहेत. त्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री जावद जरीफ यांनी आज इराण अमेरिकेसोबत नवीन संबंध बनवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. जावद जरीफ यांनी एका मुलाखतीत अमेरिकेत झालेल्या सत्तांतरानंतर इराण अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. 

इराणचे परराष्ट्रमंत्री जावद जरीफ यांनी आज एका मुलाखतीत बोलताना, अमेरिकेचे नवे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाकडे 2015 मध्ये झालेल्या अणुकरारामध्ये प्रवेश करण्यासाठी मर्यादित संधीची खिडकी खुली असल्याचे वक्तव्य केले आहे. इराणसोबत झालेल्या या करारामध्ये पुन्हा सहभागी होण्यासाठी अमेरिकेला अमर्याद वेळ नसल्याचे म्हणत, घड्याळाचे काटे सतत फिरत असल्याचे जावद जरीफ यांनी म्हटले आहे. याशिवाय अमेरिकेच्या नव्या प्रशासनाकडे या अणुकरारात सामील होण्याची मर्यादित संधी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आणि जो बायडन यांना ट्रम्प प्रशासनाच्या अपयशी ठरलेल्या धोरणांचा फायदा घेऊन आगामीवाटचाल करण्याची इच्छा नसावी, असे जावद जरीफ यांनी पुढे सांगितले आहे. 

"रावणाच्या लंकेत पेट्रेल स्वस्त,मात्र रामराज्यात महाग का ?"

अमेरिकेने इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध मागे घेतल्यास, कमीत कमी 8,000 पौंड समृद्ध युरेनियम एका दिवसात पुन्हा 2015 मध्ये ठरलेल्या करारानुसार मागे घेतले जाऊ शकते, असे जावद जरीफ यांनी या मुलाखतीत नमूद केले. याव्यतिरिक्त इराणला आण्विक शस्त्रास्त्रे बनवायचीच असती तर ती यापूर्वीच बनवली असती. परंतु अण्वस्त्रे आपली सुरक्षा वाढवत नाहीत आणि हे विचारांच्या विरोधात असल्यामुळेच इराणने अण्वस्त्रांचा पाठपुरावा केला नसल्याचे जावद जरीफ यांनी पुढे अधोरेखित केले.       

इराण सोबत 2015 मध्ये करण्यात आलेल्या संयुक्त कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन हा अणुकरारातून डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. तेहरानने युरेनियम समृद्धीकरणाच्या जबाबदाऱ्यांचा भंग केल्याचा आरोप ठेवत अमेरिका इराण सोबतच्या या करारातून बाहेर पडली होती. तर इराणने मागच्याच महिन्यात फोर्डो येथील अणुभट्टी पुन्हा सुरु करून युरेनियमचे समृद्धीकरण 20 टक्क्यांपर्यंत चालू केल्याचे जाहीर केले होते. व 2015 च्या अणुकरारापेक्षा हे प्रमाण 3.67 टक्क्यांनी अधिक असून, आण्विक शस्त्रे निर्माण करण्यासाठी मात्र 90 टक्क्यांनी कमी आहे. 

त्याचबरोबर, ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या कठोर आर्थिक बंदीतून झालेले नुकसान पुन्हा भरून काढण्यासंदर्भात इराण अमेरिकेच्या बायडन प्रशासनासोबत करार करण्यास तयार असल्याचे इराणने जाहीर केले होते. तर इराणच्या संसदेने मागील वर्षाच्या डिसेंबर मध्ये अमेरिकेने पुढील दोन महिन्यांमध्ये आर्थिक निर्बंध न हटवल्यास युरेनियमचे समृद्धीकरण वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.            

संबंधित बातम्या