Iran: ...म्हणून इराणमध्ये मुलींना दिले जात आहे विष, आरोग्यमंत्र्यांचा खळबळजनक खुलासा

इराणचे उपमंत्री युनेस पनाही यांनी सांगितले की, काही लोक मुलींचे शिक्षण थांबवण्याच्या हेतुपुर्वक प विद्यार्थिनींना विष देत होते.
Iran
IranDainik Gomantak

अनेक देशांमध्ये मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते. पण इराणमध्ये शेकडो मुलींना शाळेत जाण्यापासून रोखण्यासाठी विष दिले जात असल्याची घटना समोर आली आहे. इराणचे उपमंत्री युनूस पनाही यांनी रविवारी म्हणजेच 26 फेब्रुवारी ही माहिती दिली आहे. काही लोक मुलींचे शिक्षण थांबवण्यासाठी जाणिवपुर्वक पवित्र शहर कोममध्ये शालेय विद्यार्थिनींना विष दिले जात आहे.

उप आरोग्य मंत्री युनूस पनाही यांनी विषबाधा जाणिवपुर्वक करण्यात येत असल्याचा खुलासा केला आहे. इराणचे उपमंत्री युनेस पनाही (Younes Panahi) यांनी सांगितले की, मुलींना विष दिल्याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

  • इराणमध्ये मुलींना विष दिल्या जात आहे

गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून श्वसन विषबाधाची शेकडो प्रकरणे नोंदवल्या गेल्या आहेत. प्रामुख्याने तेहरानच्या दक्षिणेकडील कोममधील शाळकरी मुलींमध्ये, त्यापैकी काहींना रुग्णालयात उपचाराची गरज आहे. आयआरएनआय (IRNA) राज्य वृत्तसंस्थेने इराणचे उपमंत्री युनूस पनाही यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, काही लोक मुलींचे शिक्षण थांबवण्यासाठी जाणिवपुर्वक पवित्र शहर कोममध्ये शाळकरी मुलींना विष पाजत आहेत.

  • या कारणासाठी दिले जात आहे विष

राज्य वृत्त एजन्सी आयआरएनआय (IRNA) ने पनाहीच्या माहितीनुसार सांगितले की, "कौममधील शाळांमध्ये अनेक विद्यार्थिनींना विषबाधा झाल्यानंतर असे आढळून आले की काही लोकांना सर्व शाळा, विशेषत: मुलींच्या (Girls) शाळा बंद कराव्यात असे वाटत होते." पण या घटनेबाबत अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. अहवालानुसार 14 फेब्रुवारी रोजी आजारी विद्यार्थ्यांचे पालक अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागण्यासाठी शहराच्या राज्यपालांच्या कार्यालयाबाहेर जमले होते.

Iran
Indian Billionaires: भारतातील अनेक अब्जाधीशांनी सोडले नागरिकत्व, वाचा कारण
  • या घटनेचा तपास सुरु

दुसऱ्या दिवशी सरकारचे प्रवक्ते अली बहादोरी जहरोमी यांनी सांगितले की गुप्तचर आणि शिक्षण मंत्रालय विषबाधेचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या आठवड्यात अभियोजक जनरल मोहम्मद जाफर मोंटाझेरी यांनी घटनांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहे. गेल्या वर्षी महसा अमिनीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर देशभरात हिंसक निदर्शने सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com