अमेरिकेसोबतच्या व्हिएन्नातील अणुकरार चर्चेतून इराणचा काढता पाय 

US IRAN
US IRAN

अमेरिकेसोबत व्हिएन्ना येथे होणाऱ्या कोणत्याही बैठकीत सहभागी होणार नसल्याचे इराणने आज म्हटले आहे. तर, 2015 मध्ये झालेल्या अणु करारात सहभागी असलेल्या उर्वरित देशांसोबत पुढील आठवड्यात होणाऱ्या सत्र बैठकीत भाग घेत असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळाने म्हटले आहे. तसेच, इराण ज्या कोणत्याही बैठकीत उपस्थित आहे तेथे अमेरिका भाग घेणार नाही. मग संयुक्त समितीच्या बैठकीसह निश्चित असल्याचे इराणचे उप परराष्ट्रमंत्री अब्बास अरक्काची यांनी संकेतस्थळावर नमूद केले. 

तसेच, 2015 मध्ये अणु करारातील इतर देश अमेरिकेबरोबर द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय सल्लामसलत करणार असतील तर हा त्यांचा प्रश्न असल्याचे इराणचे उप परराष्ट्रमंत्री अब्बास अरक्काची यांनी म्हटले आहे. परंतु इराणी प्रतिनिधीमंडळाची कोणत्याही स्तरावरील अमेरिकन प्रतिनिधी मंडळाशी चर्चा होणार नसल्याचे त्यांनी पुढे इराणच्या परराष्ट्र संकेतस्थळावर म्हटले आहे. यापूर्वी, पुढील आठवड्यात व्हिएन्ना येथे होणाऱ्या अणू कराराच्या बैठकीत भाग घेणार असल्याचे अमेरिकेने आजच स्पष्ट केले होते. तसेच अमेरिकेने या बैठकीच्या वेळेस इराणशी थेट चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला होता. या बैठकीमुळे इराणशी थेट चर्चेचे पर्याय खुले होणार असल्याचे मत अमेरिकेने व्यक्त केले होते. 

दरम्यान, युरोपियन युनियनने आज 2015 मध्ये इराण समवेत झालेल्या अणु करारातील देशांची व्हिएन्ना मध्ये बैठकीची घोषणा केली होती. या देशांच्या समूहाला जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन म्हणून ओळखले जाते. मात्र 2018 मध्ये अमेरिकेची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती असताना त्यांनी इराण सोबतच्या या करारातून एकतर्फी माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. तर, जो बायडन यांनी अमरिकेच्या अध्यक्षपदी आरूढ होताच या करारात पुन्हा सामील होण्यास सहमती दर्शवली होती.    

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com