
Swaminarayan Temple Vandalised In Melbourne: मेलबर्नमधील एका प्रसिद्ध हिंदू मंदिराची 'असामाजिक तत्वांनी विटंबना केली आहे. ही घटना द्वेषमूलक गुन्हेगारीची असल्याचे दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर समाजकंटकांनी भारतविरोधी भित्तिचित्रे रंगवली. वृत्तानुसार, मेलबर्नच्या उत्तरेकडील उपनगरातील मिल पार्कमध्ये असलेल्या BAPS स्वामीनारायण मंदिरात ही घटना घडली. मात्र ही घटना कोणत्या वेळी घडली हे अद्याप समजू शकलेले नाही.
दरम्यान, नॉर्दर्न मेट्रोपोलिटन रीजनचे लिबरल खासदार इव्हान मुलहोलँड यांनी ट्विट करत म्हटले की, “आज मिल पार्क मंदिराच्या विद्रुपीकरणानंतर BAPS स्वामीनारायण मंदिर समुदायाचा विचार करत आहे. व्हिक्टोरियातील शांतताप्रिय हिंदू (Hindu) समाजासाठी ही घटना अत्यंत अस्वस्थ करणारी आहे.''
दरम्यान, BAPS स्वामीनारायण संस्थेने एक निवेदन जारी करुन शांततेचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे आम्हाला खूप दु:ख झाले आहे.
गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, "ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील मिल पार्क येथील BAPS श्री स्वामीनारायण मंदिराच्या प्रवेशद्वारावर समाजकंटकांनी केलेल्या भारतविरोधी (India) भित्तिचित्रांमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. जगभरातील सर्व BAPS मंदिरांप्रमाणे, मिल पार्क येथील BAPS मंदिर देखील शांतता, सौहार्द, समता, निःस्वार्थ सेवा आणि वैश्विक हिंदू मूल्यांचे निवासस्थान आहे.''
निवेदनानुसार, 'आध्यात्मिक धार्मिक नेते आणि BAPS स्वामीनारायण संस्थेचे प्रतिनिधी शांतता आणि ऐक्यासाठी प्रार्थना करतात. त्याचबरोबर आम्ही सर्व भक्त आणि हितचिंतकांना शांतता राखण्याचे आवाहन करत आहोत.'
त्यात पुढे म्हटले आहे की, 'आम्ही ऑस्ट्रेलिया आणि भारत सरकारांसह स्थानिक समुदाय संस्थांसह, त्यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. ऑस्ट्रेलियातील BAPS मंदिर हे एका समृद्ध बहुसांस्कृतिक समाजाचे प्रतीक आहे, जे आदर, मैत्री आणि सहिष्णुता या ऑस्ट्रेलियन मूल्यांचे पालनपोषण करते.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.