व्लादिमीर पुतिन करतायेत ब्रिटनवर सायबर हल्ल्याची तयारी? 50 स्लीपर एजंट सक्रिय

गेल्या 4 महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जग तणावाखाली आहे.
Vladimir Putin
Vladimir PutinDainik Gomantak

Putin preparing to attacks on Britain: गेल्या 4 महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जग तणावाखाली आहे. अशा परिस्थितीत आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. वेस्टर्न मीडियाने गुप्त एजंट्सच्या हवाल्याने म्हटले आहे की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युनायटेड किंगडम (यूके) वर सायबर हल्ला करण्याची तयारी केली आहे. पुतीन यांनी सायबर हल्ल्यांबाबत त्यांच्या योजनेवर कामही सुरु केल्याचे वृत्त आहे. (is vladimir putin preparing to conduct cyber attacks on britain sleeper agent active)

पुतिन यांनी हल्ल्याची योजना का आखली?

युक्रेन (Ukraine) विरुद्धच्या युद्धाबाबत पाश्चात्य देशांसोबत वाढत असलेल्या शत्रुत्वाच्या दरम्यान, पुतिन यांनी यूकेच्या नागरी आणि लष्करी पायाभूत सुविधांवर सायबर हल्ले सुरु करण्यासाठी 50 स्लीपर एजंट्स नियुक्त केले आहेत.

Vladimir Putin
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निधनाची जोरदार चर्चा; नेमकं सत्य काय?

गुप्त माहिती मिळवण्याची तयारी

UK च्या प्रीमियम इंटेलिजन्स एजन्सी M15 च्या शीर्ष तज्ञांनी भीती व्यक्त केली आहे. रशियन एजंट युक्रेन आणि रशियातील (Russia) असंतुष्ट गटांना लक्ष्य करण्यासाठी लष्करी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुतिन यांचे हेर सर्वत्र आहेत

लंडनच्या (London) गुप्तचर संस्थेने सांगितले की, पुतिन यांचे हेर देशामध्ये सर्वत्र आहेत. ज्यामध्ये हे हेर सार्वजनिक शाळांपासून ते नागरी सेवा आणि हाउस ऑफ कॉमन्सच्या कर्मचाऱ्यांपर्यंत उपस्थित आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com