नायजेरियात दहशतवाद्यांनी 20 जणांची गळा चिरुन केली हत्या

इस्लामिक स्टेट (ISIS) च्या दहशतवाद्यांनी मध्यपूर्वेत मारल्या गेलेल्या आपल्या प्रमुखाच्या हत्येचा बदला घेतला आहे.
ISIS
ISISDainik Gomantak

इस्लामिक स्टेट (ISIS) च्या दहशतवाद्यांनी मध्यपूर्वेत मारल्या गेलेल्या आपल्या प्रमुखाच्या हत्येचा बदला घेतला आहे. वास्तविक, नायजेरियात (Nigeria) आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी 20 ख्रिश्चनांची गळा चिरुन हत्या केली आहे. दहशतवादी संघटनेने या क्रू घटनेचे फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये तोंडावर कापड बांधलेले दहशतवादी हातात चाकू आणि बंदुका घेऊन फिरताना दिसत आहेत. (Islamic State militants have killed 20 Christian civilians in Nigeria)

दरम्यान, मारले गेलेले लोक गुडघे टेकून बसले आहेत. बोर्नो राज्यात ही हृदयद्रावक घटना घडवली आहे. हे तेच क्षेत्र आहे, जिथे बोको हराम आणि इस्लामिक स्टेट इन वेस्ट आफ्रिका (ISWAP) या अतिरेकी गट लोकांचे अपहरण आणि लूटमार करतात.

ISIS
इस्रायलने ‘पत्रकाराची जाणीवपूर्वक हत्या केली’, अल जझीराचा गंभीर आरोप

तसेच, दहशतवाद्यांनी जारी केलेल्या ताज्या व्हिडिओमध्ये एका दहशतवाद्याने म्हटले आहे की, या हत्या या वर्षाच्या सुरुवातीला मध्यपूर्वेत मारल्या गेलेल्या ISIS दहशतवाद्यांचा बदला आहे. दहशतवाद्यांशी (Terrorists) संबंधित एका आउटलेटवर हा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. यावेळी मारले गेलेले लोक सामान्य लोकांचे कपडे घातलेले दिसले.

गेल्या आठवड्यात बोर्नो राज्याच्या ईशान्येत दहशतवाद्यांनी सात जणांची हत्या केली तेव्हा ही घटना घडली आहे. चिबोक भागातील कौतुकारी गावात दहशतवाद्यांनी हल्ला केला. यादरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (António Guterres) जिहादी हिंसाचारात वाचलेल्यांना भेटण्यासाठी राज्यात होते.

ISIS
...म्हणून युक्रेनच्या सैन्याचा आत्मविश्वास वाढला

दहशतवाद्यांनी गावकऱ्यांवर हल्ला केला

बोर्नो राज्याची राजधानी मैदुगुरीपासून चिबोक प्रदेश 70 मैलांवर आहे. राजधानीत, यूए प्रमुखाने अतिरेक्यांची भेट घेतली, जे आता सामान्य जीवन जगत आहेत. याशिवाय त्यांनी दहशतवादी हल्ल्यांमुळे विस्थापित झालेल्या हजारो लोकांचीही भेट घेतली. त्याचवेळी कौतुकारी गावातील एक समुदाय नेते हसन चिबोक म्हणाले, "आम्ही (Terrorists) मोठ्या संख्येने आले आणि त्यांनी लोकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली." ते पुढे म्हणाले की, हल्ला रोखण्यासाठी जवळच्या लष्करी तळावरुन सैन्य तैनात करण्यात आले होते. आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, 'लष्कर पोहोचेपर्यंत या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता.'

दहशतवादी हल्ल्यात 35 हजार लोकांचा मृत्यू झाला

नायजेरिया (Nigeria) हा आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. हा देश गेल्या 10 वर्षांपासून ईशान्येकडील बोको हराम आणि इस्लामिक स्टेटच्या (Islamic State) दहशतवाद्यांच्या हिंसाचाराचा सामना करत आहे. दहशतवाद्यांना इथे शरिया कायदा लागू करुन पाश्चिमात्य शिक्षण बंद करायचे आहे.

ISIS
Russia-Ukraine War: रशियन सैन्याचा युक्रेनच्या आणखी एका शहरावर ताबा

संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, या भागातील हिंसाचारात आतापर्यंत 35,000 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक बेघर झाले आहेत. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मुहम्मदु बुहारी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, 'अतिरेक्यांवरील युद्ध अंतिम टप्प्यात येत आहे.' लष्कराकडून (Army) येथे होत असलेल्या कारवाईचा दाखला देत त्यांनी ही माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com