तालिबानला IS चा धोका,अफगाणिस्तानातिल अनेक ठिकाणं टार्गेटवर
Islamic State new challenge Taliban in AfghanistanDainik Gomantak

तालिबानला IS चा धोका,अफगाणिस्तानातिल अनेक ठिकाणं टार्गेटवर

इस्लामिक स्टेटने (Islamic State) आपले कमांडर देशाच्या प्रत्येक प्रांतात तैनात केल्याच्या बातम्याही येत आहेत.

अफगाणिस्तानात (Afghanistan) सत्तेवर असलेल्या तालिबानला (Taliban) आता दहशतवादी गट इस्लामिक स्टेटकडून (IS) सातत्याने आव्हान दिले जात आहे. या अनुक्रमात शुक्रवारी अफगाणिस्तानच्या कुंदुज (Kunduz) येथील एका मशिदीवर दहशतवादी गटाने हल्ला केला आहे, ज्यामध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. किंबहुना, ऑगस्टपासून देशात आयएसकडून होणारे हल्ले तीव्र झाले आहेत. इस्लामिक स्टेटने (Islamic State) आपले कमांडर देशाच्या प्रत्येक प्रांतात तैनात केल्याच्या बातम्याही अनेकदा येत आहेत.(Islamic State new challenge Taliban in Afghanistan)

त्याचवेळी, एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने आयएसच्या वतीने हा स्फोट घडवून आणला त्याची ओळख उईघुर मुस्लिम आहे. हा हल्ला झाल्यांनतर जी माहिती मिळत आहे त्यानुसार , तालिबान आणि शिया मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आले कारण त्यांना चीनला पाठिंबा देताना उइघुर समुदायाला हद्दपार करायचे आहे. आयएसची वृत्तसंस्था अमाक या वृत्तसंस्थेने यावर एक निवेदन देखील जारी केले आहे.

आयएसने काबूलमध्ये झालेलया दोन प्राणघातक बॉम्बस्फोटांची जबाबदारीही स्वीकारली आहे ,ज्यात काबूल विमानतळाबाहेर 26 ऑगस्टला झालेल्या भीषण हल्ल्याचा समावेश होता ज्यात 169 अफगाणी आणि 13 अमेरिकन सैनिक ठार झाले होते या व्यतिरिक्त रविवारी काबुल ईदगाह मशिदीच्या बाहेर बॉम्बस्फोट झाला होता ज्यात पाच नागरिक ठार झाले होते. याव्यतिरिक्त, बुधवारी मदरसेला लक्ष्य करण्यात आले, मात्र याची जबाबदारी आयएसने स्वीकारलेली नाही.

Islamic State new challenge Taliban in Afghanistan
तालिबान आणि अमेरिकेत पहिल्यांदाच चर्चा

दरम्यान मानवाधिकार आयोगाने आज कुंदुजमधील सय्यदाबाद मशिदीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे . शिया आणि हजारा समुदायाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने यावर चिंता व्यक्त केली आहे आणि म्हटले की या समुदायाच्या सुरक्षेसाठी कोणतीही सुनियोजित व्यवस्था नाही. बॉम्ब स्फोट झाला तेव्हा शिया मुस्लिम प्रार्थना करण्यासाठी मशिदीत जमले होते. एका आठवड्यात धार्मिक स्थळाला लक्ष्य करण्याची ही तिसरी घटना आहे. यामध्ये 100 हून अधिक लोक मरण पावले आणि डझनभर जखमी झाले.

Related Stories

No stories found.