Israel Airstrikes in Gaza: इस्त्रायलमधील सत्तांतरणानंतर तिसऱ्या दिवशीच गाझा पट्टीत हल्ले

Israel Airstrikes in Gaza: इस्त्रायलमधील सत्तांतरणानंतर तिसऱ्या दिवशीच गाझा पट्टीत हल्ले
BENET 1.jpg

दक्षिण इस्त्रायलमध्ये (Southern Israel) पॅलेस्टाईनमधील (Palestine) दहशतवाद्यांनी आग लावण्यात आलेले मोठे आकाराचे फुगे पाठवल्यानंतर इस्त्रायलच्या हवाईदलाने बुधवारी गाझा पट्टीमध्ये (Gaza Strip) हवाई हल्ले सुरु केले आहेत. इस्त्रायल लष्कर (Israeli army) आणि पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, हे आग लावलेले फुगे पाठवण्यात आल्याने गाझा आणि इस्त्रायलमध्ये युध्दबंदीचा निर्णय घेण्यात आला असतानाही पुन्हा एकदा हल्ले करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यामधील 21 तारखेला दोन्ही बाजूकडून शस्त्रसंधीसंदर्भात एकमत झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा हवाई हल्ल्यामुळे संघर्ष  उफाळून येण्याची शक्यता आहे.

पॅलेस्टाईनमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गाझा शहराच्या दक्षिणेतील खान युनुसच्या (Khan Yunus) पूर्वेकडील एका ठिकाणावर इस्त्रायलच्य़ा हवाईदलाने हल्ला केला. खान युनुसमधील एका छायाचित्रकाराने हे बॉम्ब हल्ले स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले आहेत. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, आग लावलेल्या फुग्यांचं प्रतिउत्तर देण्यासाठी लढाऊ विमांनानी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना असणाऱ्या हमासने दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. (Israel Airstrikes in Gaza Attacks in the Gaza Strip on the third day after the transition in Israel)

हल्ला नेमका कुठे झाला?
इस्त्रायलच्या डिफेन्सने जाहीर केलेल्या माहितीनुसार, ''खान युनुसमध्ये दहशतवाद्यांची बैठक आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत.''  

सत्तांतरणाच्या तिसऱ्या दिवशी एअर स्ट्राइक
इस्त्रायलचे पंतप्रधान म्हणून सलग 12 वर्षे राहिलेले बेन्यामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांना अखेर राजसत्तेवरुन पायउतार व्हावे लागले. इस्त्रायलच्या संसदेने रविवारी यामिना पक्षाचे प्रमुख नप्ताली बेनेटे(naftali bennett) यांच्या आघाडी सरकारला कौल दिला आहे. बेनेट सरकारने सत्तांतरण झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये गाझा पट्टीवर पहिला एअर स्ट्राईक केला आहे. पॅलेस्टाईनमधून पाठवण्यात आलेल्या आगीच्या फुग्यांमुळे दक्षिण इस्त्रायलमधील 20 ठिकाणी आग लागण्याची घटना घडली असल्याची माहिती इस्त्रालच्या अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com