'आमचा अंत पाहू नका', इस्रायलने दिली या दहशतवादी संघटनेला चेतावणी

करिश गॅस फील्डच्या मालकीवरून इस्रायल आणि लेबनॉनमध्ये तणाव वाढला आहे.
Yair Lapid
Yair LapidTwitter

Israel: भूमध्यसागरीयातील वादग्रस्त भागात त्याच्या एका गॅस रिगच्या दिशेने जाणारे तीन हिजबुल्ला ड्रोन खाली पाडल्याचा दावा इस्त्राईलमधील अधिकाऱ्यांनी केला आहे. इस्त्राईली सैन्याने सांगितले की, त्यांनी लेबनीज अतिरेकी गट हिजबुल्लाहच्या क्षेत्राकडे जाणारे मानवरहित विमान खाली पाडले. या ठिकाणी नुकतेच भूमध्य समुद्रात इस्त्राईली गॅस प्लॅटफॉर्म स्थापित केले गेले होते. (Israel Drone Attack)

इस्त्राईल आणि लेबनॉन यांच्या सागरी सीमेवर अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेला तोडफोड करण्याचा हिजबुल्लाहचा प्रयत्न आहे म्हणून ड्रोन पाठवल्याचे इस्त्रायचे म्हणणे आहे. या महासागर श्रेणीत नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणात आढळतो. म्हणून असे कृत्य केले जात असल्याचा दावा इस्रायलमधील अधिकाऱ्यांनी केला आहे. त्याशिवाय या ड्रोनचा त्वरीत शोध घेण्यात आला असल्याचेही इस्त्रायली सैन्याने सांगितले.

Yair Lapid
इम्रान खानची पत्नी बुशरा बीबी यांचा देशविरोधी हॅशटॅग चालवण्याची सूचना देणारा खळबळजनक ऑडिओ लीक

पंतप्रधान यायर लॅपिड यांनी दिला कडक इशारा

इस्त्राईलचे काळजीवाहू पंतप्रधान यायर लॅपिड (Yair Lapid) यांनी या घटनेबाबत कडक इशारा दिला आहे. शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्या संबोधनात लॅपिड म्हणाले, "या क्षणी मी तुमच्यासमोर उभा राहून, गाझा ते तेहरान, लेबनॉनच्या किनाऱ्यापासून ते सीरियापर्यंत, आम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या सर्वांना मी सांगत आहे, आमची परीक्षा घेऊ नका, आमचा अंत पाहू नका, इस्त्राईलला येणाऱ्या प्रत्येक संकटा विरूद्ध आणि प्रत्येक शत्रूविरुद्ध आपली शक्ती कशी वापरायची हे माहित आहे."

Yair Lapid
Comet Moving To Earth: वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येतोय 'K2' धूमकेतू ! फक्त 11 दिवस बाकी

करिश गॅस क्षेत्राचा वाद

इस्त्राईलने या महिन्याच्या सुरुवातीला करिश गॅस फील्डमध्ये गॅस रिग स्थापित केली. इस्रायलचे म्हणणे आहे की, ही गॅस फील्ड त्यांच्या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त आर्थिक जलक्षेत्रात येते, परंतु लेबनॉनचा दावा आहे की हे गॅस रिग वादात्मक जलक्षेत्रात आहे. दरम्यान, करिश गॅस फील्डच्या मालकीवरून इस्रायल आणि लेबनॉनमध्ये तणाव वाढला आहे. अमेरिकेचे ऊर्जा दूत अमोस हॉचस्टीन हे दोन्ही देशांदरम्यान दीर्घकाळ चाललेला वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत आहेत. इस्त्राईलचे म्हणणे आहे की, हे क्षेत्र त्याच्या UN-मान्यताप्राप्त अनन्य आर्थिक झोनमध्ये आहे, परंतु लेबनॉनने देखील त्याच्या काही भागांवर दावा केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com