Israel-Hamas Conflict: अन्न, पाणी, वीजेविना गाझातील नागरिकांचे हाल; इस्राइलने केली नाकेबंदी

Israel-Hamas Conflict: गाझा मध्ये झालेल्या गोळीबारात जवळजवळ १९०० पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarDainik Gomantak

Israel-Hamas Conflict: इस्राइल हमासमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ७ ऑक्टोबरला हमासने इस्राइलवर हवाई हल्ला केला आणि अचानक झालेल्या हल्ल्यानंतर इस्राइलने युद्धाची घोषणा केली. आता हा संघर्ष वाढताना दिसत आहे.

हमासने इस्राइलच्या अनेक नागरिकांना ओलीस ठेवले आहे. आता इस्राइलच्या सेनेने उत्तर गाझा पट्टीच्या भागातील ११ लाख लोकांना २४ तासाच्या आता तो प्रदेश सोडण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबरच, गाझा पट्टीतील जास्त लोकसंख्या असलेल्या प्रदेशातील पूर्णपणे नाकेबंदी केली आहे. वीज, अन्न, पाणी आणि इंधन याचा संपूर्ण पुरवठा बंद केला आहे. गाझा( Gaza ) मध्ये झालेल्या गोळीबारात जवळजवळ १९०० पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

आता इस्राइलच्या या निर्णयावर संयुक्त राष्ट्राने नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, इस्राइलचा हा निर्णय मानवतावादाविरुद्ध असल्याचे म्हटले आहे.

या युद्धामुळे आधीच खचलेल्या मोठ्या लोकसंख्येला एका प्रदेशातून कोणत्याही मदतीशिवाय दुसऱ्या प्रदेशात जायला सांगणे हे अपमानजनक असल्याचेदेखील संयुक्त राष्ट्रा( United Nation )ने म्हटले आहे. अशा प्रकारचे स्थलांतराचे दीर्घकाळासाठी विनाशकारी परिणाम मानवी जीवनावर होणार असल्याचे मतदेखील संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

Israel-Hamas War
Housing Prices: घरांच्या वाढत्या किंमतीत जगात मुंबईची मोठी झेप; 95 व्या स्थानावरून थेट 19 व्या स्थानी उडी...

दरम्यान, गाजा पट्टीतील लोकसंख्या अनेक बाबींसाठी इस्राईलवर आधारित आहे. त्यांची अशाप्रकारची नाकेबंदी आणि स्थलांतर त्यांच्यावर दीर्घकाळासाठी परिणाम करणारे आहे. आता हा संघर्ष कधी थांबणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com