इस्त्रायलने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्यावरील बंदी उठवली; जाणून घ्या

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 19 एप्रिल 2021

सार्वजनिक ठिकाणी आणि खुल्या शाळांमध्य़े मास्क बंधनकारक नसेल असं जाहीर केलं आहे.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडू लागला आहे. वाढता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारनं सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. असं असताना भारताच्या तुलनेत इतर देशांमध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचं दिसत आहे. इस्त्रायल (Israel) सारख्या देशानं सार्वजनिक ठिकाणी आणि खुल्या शाळांमध्य़े मास्क बंधनकारक नसेल असं जाहीर केलं आहे. कोरोना लसीकरणाच्या जोरावर इस्त्रायलने हे करुन दाखवलं आहे. (Israel lifts ban on wearing masks in public places Find out)

इस्त्रायलने वाढत्या कोरोना लसीकरणाच्य़ा जोरावर कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणला आहे. त्यामुळे आता इस्त्रायलमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक नसणार आहे. मात्र बंदिस्त ठिकाणी आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर शिक्षण संस्थाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच खुल्या शाळांमध्ये मास्क घालण्यास कोणत्याही प्रकारचं बंधन नसेल असही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच विदेशी पर्यटकांचं मे महिन्यापासून लसीकरण करण्यात येणार आहे.

रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी अमेरिकेत काय केले; पहा video

गेल्या वर्षी इस्त्रायलमध्ये 8 लाख 36 हजार लोकांना कोरोनाची लागणं झाल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी 6,331 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे इस्त्रायलमधील खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने कोरोना लसीकरणावर जोर दिला. देशातील एकूण लोकसंख्येपैकी 53 टक्के जनतेचं लसीकरण करण्यात आलं असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलं आहे. जवळपास 53 टक्के नागरीकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. या लसींमध्ये पी फायझर आणि बायो एनटेक लसींचा समावेश करण्यात आहे.
 

संबंधित बातम्या