इस्रायलच्या मालवाहू जहाजाचा समुद्रात स्फोट; दोन्ही देशांमध्ये वाढला तणाव

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

शुक्रवारी इस्रायलच्या मालकीच्या मालवाहू जहाजाचा स्फोट झाला. हे इस्त्रायली जहाज मध्य पूर्व भागातून बाहेर पडत होते. मध्य-पूर्वेतील अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या भागात झालेल्या स्फोटामुळे जहाज सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.

इराण: शुक्रवारी इस्रायलच्या मालकीच्या मालवाहू जहाजाचा स्फोट झाला. हे इस्त्रायली जहाज मध्य पूर्व भागातून बाहेर पडत होते. मध्य-पूर्वेतील अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या भागात झालेल्या स्फोटामुळे जहाज सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. युनायटेड किंगडम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशनच्या म्हणण्यानुसार, या स्फोटात क्रू मेंबर्सला दुखापत झाली आणि ते सुरक्षित आहेत. ओमानच्या खाडी भागात झालेल्या या स्फोटांमुळे या जहाजला जवळच्या बंदरात परत जावे लागले.

मेरीटाईम इंटेलिजेंस कंपनी ड्रायड ग्लोबलने या जहाजाची ओळख एमव्ही हेलिओस रे म्हणून केली आहे. दुसर्‍या एका खासगी सुरक्षा अधिकाऱ्याने हेलीओस असे  जहाजाचे नाव सांगितले  आहे. मरीनट्राफी.कॉम वेबसाइटवरील सॅटेलाइट-ट्रॅकिंग डेटावरून हेलियस रे शुक्रवारी अरबी समुद्रात प्रवेश करत असल्याचे समोर आले. पण नंतर अचानक उलट्या मार्गाने हे जहाज परत जायला लागले. होर्मूझच्या होर्मुझ सामुद्रधुनीकडे परत जावू लागले. हे जहाज सौदी अरेबियातील दम्ममहून येत होते आणि सिंगापूरला जाण्यासाठी निघाले होते.

कैरिबियन देशातील तुरूंगात घडली सर्वात मोठी प्राणघातक घटना 

स्फोटात इराणचा हात!

"इस्त्राईलमध्ये असे अनुमान आहे की या हल्ल्यामागे इराणचा हात होता." असे स्थानिक वृत्तानुसार म्हटले जात आहे. मात्र, या संदर्भात इस्रायली अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी थेट प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे इराण सरकारनेही या स्फोटावर भाष्य केले नाही. हा स्फोट अशा वेळी झाला आहे जेव्हा 2015 मध्ये अण्वस्त्र कराराचे तेहरान वारंवार उल्लंघन करीत आहे. इराण बिडेन प्रशासनावर आर्थिक निर्बंध हटविण्यासाठी दबाव आणत आहे.

इराणने इस्रायलवर हल्ल्याचा आरोप केला

तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या हल्ल्यांसाठी इराणने इस्रायलला दोषारोप दिले आहेत. यात मागील उन्हाळ्यात नैटजेन परमाणु सुविधांमधील अ‍ॅडव्हान्स सेंट्रीफ्यूज असेंब्ली प्लांट नष्ट करणे आणि इराणचे अव्वल वैज्ञानिक मोहसेन फाखरीजादेह यांच्या हत्येचा समावेश आहे. विशेष म्हणजे, फाखरीझादेह इस्लामिक रिपब्लीक सैन्याच्या अणु कार्यक्रमांचे प्रभारी होते. गेल्या वर्षी ज्याचा खून झाला होता.

गर्भवती हत्तीनीने केले प्राणिसंग्रहालयातील कामगाराला ठार 

 

संबंधित बातम्या