Pakistan Politics: ''काका पुरे आता'', पंतप्रधान शरीफ यांच्यावर मरियम नवाझ 'खफा'

पाकिस्तानात (Pakistan) इम्रान खान यांच्या सरकारची सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली.
Maryam Nawaz & Shehbaz Sharif
Maryam Nawaz & Shehbaz SharifDainik Gomantak

पाकिस्तानात इम्रान खान यांच्या सरकारची सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतरच पाकिस्तानातील राजकीय संकटाचा शेवट झाला. शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनले. मात्र आता शहबाज शरीफ यांचा 'राजकिय हनिमून पिरियड' संपल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी हे शाहबाज मंत्रिमंडळात सामील झालेले नाहीत. दुसरीकडे, पाकिस्तान (Pakistan) मुस्लिम लीग-नवाझमधून मतभेदाच्या बातम्या समोर येत आहेत. मरियम नवाझ (Maryam Nawaz) काका शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय. (It is learned that Maryam Nawaz is angry with Pakistan's Prime Minister Shehbaz Sharif)

दरम्यान, शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात 33 जणांना मंत्री पदे देण्यात आली आहेत. नवाझ शरीफ यांच्या गटातील एका नेत्याला मंत्रिपद देण्यात आले आहे, हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे. शाहबाज यांनी नवाझ शरीफ यांचा सहकारी सहकारी जावेद एल. लतीफ यांना मंत्रीपद दिले आहे. परंतु शाहबाज यांच्या राजकीय खेळीमुळे लतीफही चांगलेच चिडले आहेत, त्यामुळे त्यांनी अद्याप मंत्रीपदाची शपथ घेतलेली नाही. दुसरीकडे मात्र नवाझ शरीफ यांच्या बाकीच्या निकटवर्तीयांना बाजूला करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत वडिलांच्या जवळचे नेते बाजूला गेल्याने मरियम काका शाहबाज शरीफ यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त आहे. नवाझ यांच्या जवळच्या मित्रांना सोडून शाहबाज शरीफ यांनी आपल्या मंत्रिमंडळात आपल्या आवडत्या लोकांना मंत्री बनवले आहे.

नवाझ यांच्या 'या' मित्रांना केलं बाजूला

इरफान सिद्दीकी, परवेझ रशीद, मुहम्मद जुबेर आदी नेते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे खास निकटवर्तीय मानले जातात. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझमध्ये मरियम नवाझ यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांनी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या स्थापनेपूर्वी झालेल्या बैठकांमध्ये योग्य पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र शाहबाज शरीफ यांनी दिलेला शब्द पाळला नाही. सरकार स्थापन होताच शाहबाज यांनी आपल्या जवळच्या लोकांना एकत्र करुन मंत्रिमंडळात स्थान दिले. नवाझ शरीफ यांच्या निकटवर्तीयांना पूर्णपणे बाजूला करण्यात आले आहे.

बिलावल भुट्टोही शाहबाज यांच्या निर्णयांवर नाराज

शाहबाज आणि मरियम यांच्या पक्षातील गदारोळात बिलावल भुट्टो यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नव्या सरकारमध्ये बिलावल यांना परराष्ट्रमंत्री बनवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र बिलावल यांनी मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. बिलावल यांनी मंत्रीपद नाकारले, तर त्यांच्या पक्षातील मुस्तफा नवाज खोखर यांना मंत्रीपद देण्यात आले, परंतु त्यांनी मंगळवारी शपथ घेतली नाही. मला कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान द्यावे, असे खोखर यांनी म्हटले. मात्र शाहबाज यांनी त्यांना राज्यमंत्री करण्याची ऑफर दिली. दुसरीकडे, बिलावल लंडनला गेले असून, तिथे ते या संपूर्ण प्रकरणाची तक्रार नवाझ शरीफ यांच्याकडे करणार असल्याचीही चर्चा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com