Edgardo Greco: पिझ्झा शेफ म्हणून फ्रान्समध्ये लपला होता इटलीचा खूंखार माफिया, 16 वर्षांपासून...

France: जगभरातील अनेक माफियांच्या एकापेक्षा एक कथा तुम्ही वाचल्या किंवा ऐकल्या असतील.
Edgardo Greco
Edgardo GrecoDainik Gomantak

Edgardo Greco: जगभरातील अनेक माफियांच्या एकापेक्षा एक कहाण्या तुम्ही वाचल्या किंवा ऐकल्या असतील. पण आज फ्रान्समधून एका माफियाची गोष्ट समोर आली आहे. येथे गेल्या 16 वर्षांपासून फरार असलेल्या एका माफियाला फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. एडगार्डो ग्रेको हा कॅलाब्रिया (Southern Italy) मधील शक्तिशाली माफिया संघटना Andragheta शी संबंधित असल्याचा संशय आहे.

'द गार्डियन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ग्रॅको फ्रान्समध्ये जवळपास 3 वर्षांपासून पिझ्झा शेफ म्हणून काम करत आहे. तो 2006 पासून फरार असून तो इटलीचा (Italy) माफिया आहे. इंटरपोलने दिलेल्या माहितीनुसार, ग्रेकोला गुरुवारी सेंट एटना या फ्रेंच शहरातून अटक करण्यात आली.

हे रेस्टॉरंट बनावट नावाने सुरु होते

इंटरपोलने सांगितले की, ग्रेको एका टोपणनावाद्वारे येथे रेस्टॉरंट चालवत होता. द गार्डियनच्या वृत्तानुसार, ग्रेकोला पकडण्यासाठी इंटरपोलद्वारे नंद्रागेटा प्रोजेक्ट (आय-कॅन) चालवला जात होता. फ्रान्स (France) आणि इटलीच्या संयुक्त सहकार्याने ग्रॅकोची अटक शक्य झाली. हा एक प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये इंटरपोलच्या 195 सदस्य देशांमध्ये पोलिस सहकार्याची सुविधा प्रदान केली जाते.

इंटरपोलने जारी केलेल्या निवेदनानुसार, ग्रेकोची ओळख एक धोकादायक फरारी म्हणून करण्यात आली आहे, जो स्टेफानो आणि ज्युसेप्पे बार्टोलोमियो यांच्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी इटलीमध्ये हवा होता. एमिलियानो मोसियारो यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचाही आरोप ग्रेकोवर आहे.

फ्रेंच वकिलांच्या म्हणण्यानुसार, ग्रेको जून 2022 मध्ये सेंट-एटीनमधील कॅफे रॉसिनी रेस्टॉरंटचा मालक बनला आणि तिथे पिझ्झा शेफ म्हणून काम करत होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com