जॅक मा यांना चीन सरकारने उद्योजकांच्या यादीतून हटवलं

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

चीनमधील  सर्वाधिक  श्रीमंत  व्यक्तींपैकी एक  असणाऱ्या  जॅक  मा  यांना  चीन  सरकारने  झटका  दिला  आहे

बिजींग : चीनमधील  सर्वाधिक  श्रीमंत  व्यक्तींपैकी  एक  असणाऱ्या  जॅक  मा  यांना  चीन  सरकारने  झटका  दिला  आहे.  गेल्या  काही  दिवसांपूर्वी  अलीबाबा चे  संस्थापक जॅक  मा  यांनी  चीन  सरकारच्या  धोरणांवर  टिका  केली  होती.  मात्र आता  चीनमधील कम्युनिस्ट  सरकारने  देशातील  उद्योग क्षेत्रात  प्रतिष्ठीत  असणाऱ्या  यादीतून  त्यांना  हटवले  आहे.  तर  दुसरीकडे  चे  रेन  झेंगफेई, शओमीचे  लेई  जून  यांचे  चीन  सरकारने विशेष  कौतुक  केले  आहे.  त्यांनी  देशासाठी  दिलेल्या  योगदानाचा  विशेष  सन्मान  केला आहे.

म्यानमारमध्ये लष्करांनी सत्ता हाती घेतल्यानंतर अमेरिकेने दिला इशारा

जॅक  मा  यांच्या  अलिबाबा  कंपनीने  या  तिमाहीतील  कमाईचा  अहवाल  सादर करण्यापूर्वी  चीन  सरकारने हा  दणका  दिला  आहे.  मात्र  यावर  जॅक  मा  यांनी  अद्याप  तरी  कोणत्याही  प्रकारची  प्रतिक्रिया  दिलेली  नाही. यापूर्वी  चीन  सरकारच्या  धोरणावर 24  ऑक्टोबरला  आपली  नाराजी  त्यांनी  व्यक्त  केली  होती. जॅक  मा  यांनी, ''देशात कोणत्याही  प्रकारच्य़ा  संशोधनाला  वाव   दिला  जात  नाही.  त्याचबरोबर  चीन  अजूनही जुन्या  व्यक्तींचा  समूह  असल्यासारखे  वाटत  आहे. चीनची  आजची  प्रगती  ही औद्योगिकीकरणामुळे  सफल  करता  आलेली  आहे. मात्र  आपल्या  भावी  पिढीसाठी  नव्या  प्रकारची  अर्थव्यवस्था  निर्माण करावी लागणार आहे. सध्या  आपल्या  देशाची असणारी  अर्थव्यवस्था  बदलावी  लागणार  आहे.'' अशा   प्रकारे  जॅक  मा  यांनी  देशाच्य़ा एकूण  अर्थव्यवस्थेचा  आपल्या  परखड  मतातून  धांडोळा  घेतला  होता.

डब्ल्यूएचओच्या पथका कडून हुबेईतील सी फूड मार्केटला भेट; इथूनच झाला होता...

 मात्र  चीन सरकारने  जॅक  मा यांच्यावर  खफा  होत  अॅन्ट  समूहाच्या  आयपीओला   चीन  दिलेली परवानगी  नाकारली  होती. सध्या  चीन  सरकारने  या  आयओपीच्या   विरोधात  चौकशीचा फेरा  लावला  आहे. या  आयपीओची  किंमत  37  बिलीयन  अमेरिकन  डॉलर  एवढी आहे. मधल्या  काळात  अलिबाबाचे  संस्थापक  जॅक  मा  हे    गायब  असल्याचे  सांगण्यात येत  होते.

संबंधित बातम्या