नेपाळचे अर्थमंत्री म्हणून जनार्दन शर्मा घेणार शपथ

नेपाळमध्ये जनार्दन शर्मा रविवारी पुन्हा देशाचे अर्थमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
janardan Sharma
janardan Sharma Dainik Gomantak

नेपाळमध्ये जनार्दन शर्मा (Janardan Sharma) रविवारी पुन्हा देशाचे अर्थमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यापूर्वी त्यांच्यावर काही आरोपांमुळे त्यांना गेल्या महिन्यात पदावरून हटवण्यात आले होते. वार्षिक अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच करात काही बदल केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. संसदेने यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती.

चालू आर्थिक वर्षाच्या वार्षिक अर्थसंकल्पावर करात बदल केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संसदेने चौकशी समिती स्थापन केल्यानंतर शर्मा यांनी या महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला. 29 मे रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काही कर बदलण्यासाठी दोन बाहेरील लोकांना आणले गेले होते. अशा स्थानिक वृत्तपत्रातील वृत्तानंतर 13 जूनपासून जनार्दन शर्मा यांच्यावर दबाव वाढला होता. प्रतिनिधीगृहाने या महिन्यात शर्मा यांच्या चौकशीसाठी 11 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या संसदीय चौकशी समितीच्या 11 सदस्यांची नावे सभापती अग्निप्रसाद सपकोटा यांनी मांडली.

या चौकशी समितीमध्ये प्रमुख विरोधी पक्ष सीपीएन-यूएमएलचे सदस्य म्हणून खगराज अधिकारी, प्रदिप ग्यावाली, भानुभक्त ढकल आणि बिमला बीके यांच्यासह चार आमदारांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे समितीमध्ये नेपाळी काँग्रेसकडून पुष्पा भुसाळ आणि सीताराम महतो, माओवादी केंद्राकडून देव प्रसाद गुरुंग आणि शक्ती बहादूर बस्नेत यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com