Earthquake: जपान पुन्हा एकदा भूकंपाने हादरले, त्सुनामीचा इशारा

जपानमध्ये भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.3 इतकी होती.
Earthquake
EarthquakeDainik Gomantak

जपान पुन्हा एकदा भूकंपाने हादरले आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.3 इतकी होती. एवढ्या प्रचंड तीव्रतेच्या भूकंपानंतर (Earthquake) ईशान्य किनारपट्टीच्या काही भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र फुकुशिमा प्रदेशाच्या किनारपट्टीपासून 60 किमी होते. रात्री 11:36 वाजून 36 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. (Japan was once again shaken by an earthquake)

Earthquake
Earthquake: अफगाणिस्तानपासून नोएडपर्यंत भूकंपाचे तीव्र धक्के

दरम्यान, यापूर्वी 22 जानेवारी रोजी जपानच्या नैऋत्य आणि पश्चिम भागात झालेल्या भीषण भूकंपामुळे 10 हून अधिक लोक जखमी झाले होते. शनिवारी दुपारी 1.08 वाजता भूकंप झाला होता. स्पुतनिक या रशियन वेबसाइटने स्थानिक मीडियाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. जपानच्या (Japan) हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, क्यूशू बेटाजवळ 1 वाजून 2 मिनिटांनी भूकंप झाला, ज्याचे केंद्र 40 किलोमीटर (24.8 miles) खोलीवर होते. मात्र त्यावेळी त्सुनामीचा इशारा देण्यात आला नव्हता.

तसेच, जपानच्या क्योडो वृत्तसंस्थेनुसार, मियाझाकी, ओटा, कोची आणि कुमामोटो प्रांतांनी भूकंपाला पाच रेटिंग पॉइंट दिले होते. जपानमध्ये भूकंपाचा धोका मोजण्यासाठी 7 पॉइंट्सचा वापर केला जातो. पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. जिथे या प्लेट्स जास्त आदळतात, त्या झोनला 'फॉल्ट लाइन' म्हणतात. वारंवार टक्कर झाल्यामुळे, प्लेट्स एकमेंकावर आदळतात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. त्यामधून उष्ण हवा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि त्यामधूनच भूकंप होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com